International News : मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते :  बाराक ओबामा 

एमपीसी न्यूज   : अमेरिकेचे माजी अध्यक्ष बराक ओबामा यानी आपल्या नव्या पुस्तकात असा दावा केला आहे. की 26/11 च्या मुंबई हल्ल्यानंतर माजी भारतीय पंतप्रधान मनमोहन सिंग पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ करत होते. याच्यामुळे त्यांचे राजकीय नुकसान झाले.

 

ओबामा यांनी आपल्या पुस्तकात असा खुलासा केला आहे की, मनमोहन सिंग यांना देशात मुस्लिमविरोधी भावना वाढेल अशी चिंता होती.यामुळे भाजपची ताकद वाढत आहे, म्हणूनच मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानविरूद्ध कारवाई करण्यास टाळाटाळ केली.

त्याचबरोबर ओबामा यांनी असेही म्हटले आहे की राजकीय पक्षांमधील कडवे वाद, विविध सशस्त्र फुटीरवादी चळवळी आणि भ्रष्टाचार घोटाळे असूनही आधुनिक भारताची कहाणी अनेक प्रकारे यशस्वी म्हणता येईल.

ओबामांनी राहुल हे चिंताग्रस्त आणि स्वत:बाबत अपरिपक्व असल्याचे म्हटले आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी आपल्या पुस्तकात राहुल गांधींची तुलना एका विद्यार्थ्याशी केली आहे, ज्यांनी अभ्यासक्रम पूर्ण केला आहे जो शिक्षकांनाही प्रभावित करतो मात्र या विषयात प्राविण्य मिळवण्याची त्याच्याकडे योग्यता नाही आहे किंवा आवड नाही आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.