Mann ki Baat : पंतप्रधान मोदी आज करणार ‘मन की बात’; देशवासीयांशी नेमकं काय बोलणार?

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (दि.28) ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे सबंध देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. यावेळी मन की बात मधून पंतप्रधान नेमकं काय बोलणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं आहे. आज सकाळी 11 वाजता या कार्यक्रमाचे प्रक्षेपण होणार असून ऑल इंडिया रेडिओ, डीडी आणि नरेंद्र मोदी मोबाईल अॅप यावर हा प्रोग्रॅम ऐकता येणार आहे. 

दरवेळी वेगवेगळ्या महत्त्वपूर्ण विषयांना अनुसरून पंतप्रधान मोदी देशभरातील जनतेशी संवाद साधत असतात. सध्या देशावर ‘ओमिक्राॅन’चे संकट असल्याने यावेळी पंतप्रधान नेमकं काय बोलणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

देशभरात नव्या कोरोना व्हायरंटमुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उच्चस्तरीय अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन या नव्या व्हायरंटचे स्वरूप समजून पंतप्रधान मोदींनी धोक्याचा इशारा दिला आहे आणि निर्बंध फेरविचार करून त्याबाबत योग्य नियोजन करून त्याचा आढावा घेण्याचे आदेश सुद्धा दिले आहे.

दरम्यान संकटकाळी घाबरून न जाता नियमित मास्क वापरणे, हात धुणे, सोशल डिस्टन्सिंग या त्रिसूत्रींचा अवलंब करण्याचे आवाहन करून खबरदारी घेण्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.