Mann Ki Baat : अंजिठा लेण्यांचा वारसा डिजिटल होणार ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची माहिती

एमपीसी न्यूज – अंजिठ्याच्या लेण्यांचा वारसा डिजिटल करण्यात येत आहे. यामध्ये अजिंठा लेण्यांची संपूर्ण झलक पाहायला मिळेल. यामध्ये डिजिटलाइज्ड आणि पुन्हा स्थापन केलेल्या कलाकृती यांच्या बरोबरच यासंबंधित दस्तऐवज आाणि अनेकांनी व्यक्त केलेल्या शब्दभावना, यांचाही समावेश असणार आहे. असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन कि बात या कार्यक्रमात सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (रविवारी) ‘मन की बात’ कार्यक्रमाद्वारे देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एक अतिशय प्राचीन काळातली देवी अन्नपूर्णा मातेची मूर्ती कॅनडावरून परत भारतात येत असल्याची सांगितले. ही मूर्ती जवळपास 100 वर्षांपूर्वी वाराणसीच्या एका मंदिरातून चोरून बाहेर पाठवली होती, अशी माहिती पंतप्रधान मोदींनी दिली.

पंतप्रधान मोदी म्हणाले की, दिनांक 12 नोव्हेंबरपासून डॉक्टर सलीम अलीजी यांच्या 125 व्या जयंतीच्या कार्यक्रमाला प्रारंभ झाला आहे. डॉक्टर सलीम अली यांनी पक्ष्यांच्या दुनियेमध्ये, पक्षी निरीक्षणासंबंधी अतिशय उल्लेखनीय कार्य केलं आहे. लंगरची प्रथा सुरू करणारे गुरू नानकदेवजीच होते. आणि आज आपण पाहिलं की, दुनियाभरामध्ये शीख समुदायाने कोरोना काळामध्ये लोकांना भोजन देऊन कशा प्रकारे आपली परंपरा सुरू ठेवली आहे. मानवतेची सेवा केली. ही परंपरा आपल्या सर्वांना निरंतर प्रेरणा देण्याचे काम करते असे नरेंद्र मोदी आपल्या भाषणात म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.