Mann ki Baat: लॉकडाऊन शिथिल करत असताना सर्वांनी अधिक सतर्क राहण्याची गरज – पंतप्रधान

Mann ki Baat: Everyone needs to be more vigilant while relaxing the lockdown - PM

एमपीसी न्यूज – करोनापासून बचावासाठी विविध प्रकारे सावधानता बाळगत आपण आता रेल्वे वाहतूक, विमान वाहतूक सुरु केली आहे. हळूहळू उद्योग व्यवसाय देखील सुरु झाले आहेत. म्हणजेच अर्थव्यवस्थेचा एक मोठा भाग आता सुरु झाला आहे. त्यामुळे आता आपल्याला अधिक सतर्क राहण्याची आवश्यकता आहे, अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. सुरक्षित अंतर, मास्कचा पालन, वैयक्तिक आरोग्याची काळजी हे यापुढेही सुरूच ठेवायचे आहे, असे त्यांनी देशवासीयांना बजावले.

‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमातून रविवारी त्यांनी देशवासियांशी संवाद साधला. पंतप्रधान म्हणाले, “देशात सर्व नागरिकांच्या सामूहिक प्रयत्नांतून कोरनाविरोधातील लढाई अधिक मजबुतीने लढली जात आहे. आपली लोकसंख्या ही इतर देशांच्या तुलनेत कितीतरी पट अधिक आहे. तरी देखील करोनाचा आपल्या देशात इतर देशांच्या तुलनेत वेगानं फैलाव हाऊ शकला नाही.”

कोरोना व्हायरसचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे, असे पंतप्रधान म्हणाले. मजुरांना काम देण्यासाठी उपाययोजना सुरू झाल्या आहेत. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झाले आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावे म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत, असेही पंतप्रधानांनी यावेळी म्हणाले. कोरोनाच्या काळातही मन की बात सुरूच राहिली. आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता अधिक सर्तक राहण्याची गरज आहे. देशात कोरोनाविरोधातील लढाई मजबूत लढवली जात आहे, असे मोदी यांनी सांगितले.

मोदी म्हणाले की, मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीनं भरपूर काम झालं आहे. आत्मनिर्भर भारत अभियान या दशकात भारताला नव्या उंचीवर घेऊन जाईल. मेक इन इंडियासह अनेक जण उद्योग सुरू करत आहे.

नाशिकच्या राजेंद्र जाधव यांच्याबद्दल मोदींचे गौरवोद्गार

आपल्या संबोधनात पंतप्रधान मोदी यांनी नाशिकच्या राजेंद्र जाधव या शेतकऱ्याचा उल्लेख केला.  भारतात कोरोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही. वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही.

रेल्वेचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाही श्रमिकांना घरी सोडत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे, असं मोदी यांनी यावेळी सांगितलं. सोशल मीडियावर अनेक दृश्य पाहत आहे. दुकानदारही खबरदारी घेत आहे. फिजिकल डिस्टन्स पाळलं जावं म्हणून अनेक युक्त्या लढवल्या जात आहे. कोरोनाच्या विरोधात हे खूप वेगळं आहे, असं ते म्हणाले.

‘माय लाईफ, माय योग’ स्पर्धा

यावेळी मोदी यांनी एका अनोख्या योग स्पर्धेची घोषणा केली. जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारतानं जगभरात योग पोहोचवला. योग मंत्रालयानं एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचं आहे, असे मोदी यांनी सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘मन की बात’…. ऐका!

  • आयुषमान भारत योजनेतून अनेक गरीब आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या नागरिकांनी उपचार घेतले. देशात अनेकांना या योजनेचा फायदा झाला आहे. याच श्रेय देशातील प्रामाणिक करदात्यांचंही आहे. त्यांनी कर दिल्यामुळे गरीबांना उपचार घेता येत आहे.
  • जागतिक योग दिवस जवळ येत आहे. भारतानं जगभरात योग पोहोचवला. आयुष मंत्रालयानं एक ब्लॉग सुरू केला आहे. माय लाईफ माय योग. त्यातून स्पर्धा घेण्यात येणार असून, योग केल्यामुळे आयुष्यावर काय परिणाम झाला, हे तीन मिनिटाच्या व्हिडीओतून सांगायचं आहे
  • मागील काही वर्षात विकासाच्या दृष्टीनं भरपूर काम झालं आहे. आता स्थलांतरित मजुरांच्या दृष्टीनं काम सुरू झालं आहे. घरी परतणाऱ्या मजुरांना काम मिळावं म्हणून वेगवेगळ्या राज्यात उपाययोजना हाती घेतल्या जात आहेत.
  • करोनाचा सर्वाधिक फटका गरीब आणि श्रमिकांना बसला आहे. त्यांना प्रचंड वेदना भोगाव्या लागत आहे. रेल्वेचे कर्मचारी दिवसरात्र मेहनत घेत आहेत. त्याचप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्थाही श्रमिकांना घरी सोडत आहेत. त्यांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. लोक डिस्टन्स पाळले जावेे म्हणून प्रयत्न करत आहेत.
  • सोशल मीडियावर अनेक दृश्य पाहत आहे. दुकानदारही खबरदारी घेत आहे. फिजिकल डिस्टन्स पाळलं जावं म्हणून अनेक युक्त्या लढवल्या जात आहे. करोनाच्या विरोधात हे खूप वेगळे आहे.
  • भारतात करोनाविरोधात सर्वजण प्रयत्न करत आहेत. देशातील वेगवेगळ्या भागात लोक स्वतःला सेवेत वाहून घेत आहेत. जे या कामात स्वतःला गुंतवून ठेवत आहेत. त्यांना कसलाही दुसरा विचार सतावत नाही.वेळेमुळे अनेक संस्था, व्यक्ती आणि सेवा करणाऱ्यांची नाव घेऊ शकत नाही.
  • करोनाच्या काळातही मन की बात सुरूच राहिली. आता अनेक गोष्टी सुरू झाल्या आहेत. श्रमिक रेल्वे, विमान सेवा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आता अधिक सर्तक राहण्याची गरज आहे. देशात करोनाविरोधातील लढाई मजबूत लढवली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.