Mann Ki Baat : मन की बातच्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 26/11 च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातील पीडितांचे केले स्मरण

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ( Mann Ki Baat) मासिक रेडिओ कार्यक्रम मन की बातच्या 107 व्या आवृत्तीत देशाला संबोधित केले, ज्या दरम्यान त्यांनी मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याचे स्मरण केले आणि हल्ल्यादरम्यान शहीद झालेल्यांचा सन्मान केला.

तसेच पंतप्रधानांनी संविधान दिनानिमित्त लोकांना शुभेच्छा देताना सांगितले की, “देशाच्या काळ, परिस्थिती आणि गरजा लक्षात घेऊन विविध सरकारने वेगवेगळ्या वेळी सुधारणा केल्या.” त्या अनुषंगाने, ते म्हणाले की 44 वी घटना दुरुस्ती आणीबाणीच्या चुका सुधारण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे.

Forex Trading : आर्थिक गुंतवणूक करण्याआधी जाणून घ्या भारतातील अनधिकृत फॉरेक्स ट्रेडिंग कंपन्या

सरकारच्या ‘वोकल फॉर लोकल’ उपक्रमाला पुढे करत पंतप्रधानांनी परदेशात विवाह सोहळे आयोजित करण्याच्या ‘काही कुटुंबां’च्या प्रथेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विवाह सोहळा देशातच आयोजित करण्याचे आवाहन केले.

राष्ट्र उभारणीत नारी सहभागाचे महत्त्व सांगताना ते म्हणाले, “नारी शक्ती वंदन अधिनियम हे संकल्प शक्तीचे उदाहरण आहे, लोकशाहीच्या संकल्पाची ताकद आहे. यामुळे विकसित भारताचा आमचा संकल्प पूर्ण करण्याच्या गतीला चालना मिळेल.”

“माय भारत संस्था भारतातील तरुणांना विविध राष्ट्रनिर्मिती कार्यक्रमांमध्ये सक्रिय भूमिका बजावण्याची संधी देईल. विकसित भारताच्या उभारणीसाठी भारतातील युवाशक्तीला एकत्रित करण्याचा हा अनोखा प्रयत्न आहे.

मेरा युवा भारतची वेबसाइट माय भारत देखील लॉन्च होणार आहे. मी तरुणांना विनंती करेन  MyBharat.gov.in वर नोंदणी करा आणि विविध कार्यक्रमांसाठी साइन अप करा,”असेही ते ( Mann Ki Baat) म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.