Mann Ki Baat: सप्टेंबर महिना ‘पोषण महिना’ म्हणून साजरा होणार- पंतप्रधान मोदी

आपल्यात एक म्हण आहे ‘यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो.

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी, सकाळी 11 वाजता, ‘मन की बात’ या कार्यक्रमाद्वारे संपूर्ण देशाशी संवाद साधला. नरेंद्र मोदी यांच्या मासिक कार्यक्रमाचा हा 68 वा भाग होता. या भागात मोदी यांनी संपूर्ण सप्टेंबर महिना हा देशभरात पोषण महिना म्हणून साजरा केला जाईल, असं सांगितलं.

पोषण (न्यूट्रिशन) याचा अर्थ असा नाही की आपण काय खात आहोत, किती खात आहोत, किती वेळा खात आहोत. पोषण याचा खरा अर्थ म्हणजे आपल्या शरीराला किती आवश्यक पोषक आहार मिळत आहे हा असतो. आपल्यात एक म्हण आहे ‘यथा अन्नम तथा मन्नम’ म्हणजेच जसे आपले अन्न असते, त्याप्रमाणे आपला मानसिक आणि बौद्धिक विकास होतो. त्यामुळे पोषक आहाराला खूप महत्त्व असते, असे मत त्यांनी व्यक्त केले.

पंतप्रधान मोदींनी आज, ‘भारतीय कृषी कोष’ तयार करण्यात येणार असल्याचंही सांगितलं. यामध्ये देशातील प्रत्येक जिल्ह्यात कोणतं धान्य पिकतं? त्याची न्यूट्रिशन व्हॅल्यू किती? याची सर्व माहिती दिली जाणार आहे. याशिवाय मोदी यांनी आपल्या संबोधनात, लहान मुलांसाठी तयार करण्यात येणारी खेळणी जास्तीत जास्त प्रमाणावर स्वदेशी बनावटीची असावीत असं मत व्यक्त केलं. तसे झाल्यास भविष्यात भारत देश खेळणी तयार करण्याचे केंद्र बनू शकतो, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.