Manobodh by Priya Shende Part 50 : नसे अंतरी कामकारी विकारी

एमपीसी न्यूज – मनोबोध: मनाचे श्लोक क्रमांक 50 – (Manobodh by Priya Shende Part 50)

नसे अंतरी कामकारी विकारी

उदासीन होतो तापसी ब्रह्मचारी

निवाला मनी लेश नाही तमाचा

जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा

आपण ह्या श्लोकात (Manobodh by Priya Shende Part 50 ) बघणार आहोत, सर्वोत्तमाचा दास जगात कोणत्या गुणांनी धन्य होतो ते.

म्हणजेच खर्‍या भक्तांची अजून काही लक्षणं ह्या श्लोकात आहेत.

पहिल्या चरणात समर्थ म्हणत आहेत की,” नसे अंतरी कामकरी विकारी”. म्हणजे ज्या भक्ताच्या अंतरंगात विकार नाहीयेत, जे की कामामुळे निर्माण होतात. कामना असेल तर ती परमेश्वराची असावी. ती चांगली आहे. तशी कामना माणसाला निष्काम बनवते. पण जर विकारांमुळे काम किंवा त्यासोबतचे षड्रिपु अंतरंगात आले तर ते माणसाला स्वस्थ बसू देत नाहीत. मन शुद्ध होऊ देत नाहीत. त्याने माणसाचा फक्त ऱ्हास होतो. मनुष्य निष्काम होऊ शकत नाही, आणि परमेश्वराची भक्ती पण करू शकत नाही.

आपण कितीतरी उदाहरणे बघतो कामवासने मुळे वाईट कृती समाजात घडतात. नवरा बायकोचे संसार मोडले केवळ कामवासनेमुळे निर्माण झालेल्या एकमेकांवरच्या संशयामुळे. विश्व मित्रांसारखे तपास विजा तपोभंग झाला तो या कामामुळेच. काम पूर्णत्वाला आलं तर लालसा वाटते आणि पूर्ण नाही झालं तर क्रोध निर्माण होतो. म्हणजेच षड्रिपु हे त्या कामासोबतच चिकटलेले असतात. संसारी माणसाने एकपत्नीव्रत बाळगा व याने बऱ्याच वाईट घटना टळतील.

तर भक्तात मध्ये हा कामाचा विकार नसतो. फक्त मनाने अत्यंत शुद्ध आणि सात्विक असतो.

पुढे समर्थ म्हणताहेत की, “उदासीन असतो तापसी ब्रह्मचारी”. उदासीनता म्हणजे दुःखी उदास डोळे खोल जाऊन आभाळाकडे टक लावत व घडणारा का? तर नाही. उदासीन म्हणजे अलिप्त. सुखदुःख ज्याला एकसमान आहे. अत्यंत तटस्थपणा. कोणतीही गोष्ट साक्षीभावाने बघायला येते, असा तटस्थपणा. सुखाने हुरळून जात नाही आणि दुःखाने व्यथित होत नाही असा तो उदासीन भाव. सुखासाठी लालसा नाही की, दुःख होईल अशी काही कोणाकडून अपेक्षा पण नाही.

Todays Horoscope 02 June 2022 : जाणून घ्या आजचे राशीफळ

उदासीनता म्हणजे neutral किंवा detached. खूप कशात अडकून न पडलेला. sorted पण म्हणू शकता. आपल्याला कशातच ना अडकून पडतात जे करायचे ते स्पष्ट आहे सुनिश्चित आहे आणि त्याच मार्गाने मार्गस्थ होणारा. तर असा हा भक्तं उदासीन असतो.

तापसी म्हणजे तपश्चर्या करणारा, योगी. तो विश्वासे मारिता रिपू, निवटूनी घातला दर्पू, आणि जयाचा अहा कंपु, तापसांसी – असं ज्ञानेश्वरीत सांगितले आहे.

तर समर्थ म्हणताहेत की तो भक्त उदासीन पण असतो. तापसी म्हणजेच तपश्चर्या करणारा पण असतो, आणि ब्रह्मचारी पण असतो.

ब्रह्मचर्य म्हणजे बिना लग्नाचा, असा याचा अर्थ नाहीये. तर त्याची चर्या सतत ब्रम्हा मध्ये आहे. जो अखंड ब्रह्मभावात बुडालेला आहे. ब्रह्म म्हणजे परमात्मा आणि चर्य म्हणजे घुमणे फिरणे. जो अखंड परमात्म्यामध्ये एकरूप होत असतो. त्याच्याशिवाय काही विषयच डोक्यात फिरत नाही, असा तो ब्रह्मचारी भक्त हा धन्य होतो.

पुढे समर्थ म्हणतात की,” निवाला मनी लेश नाही तमाचा”. निवाला म्हणजे तळमळ शांत झालेला. भग भग अशांतता नसलेला, समाधानी पावलेला. मनातून अत्यंत समाधानी असलेला भक्तं. त्याला फक्त ईश्वराचे तळमळ लागते. मनात तमाचा लवलेशही नाही म्हणजेच क्रोधाचा लवलेश नाही. ज्याने तमोगुणाचा त्याग केला आहे आणि सत्वं गुण अंगीकारलंय तो, भक्त धन्य होतो.

या श्लोकाच्या (Manobodh by Priya Shende Part 50) शेवटी परत समर्थ म्हणताहेत की, “जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा”. म्हणजे तो भक्त जो सर्वोत्तमाचा म्हणजे परमेश्वराचा लाडका भक्त जगात धन्य होतो. ज्याच्या अंतरंगात काम विकार नाहीत, जो तपश्चर्या करतो, ब्रह्मचर्य पाळतो, उदासीन म्हणजे तटस्थ आहे. सर्व काही त्याच्याकडे असून जो, त्यापासून अलिप्त आहे, ज्यामध्ये तमोगुणाचा लवलेश नाही. अंतर्बाह्य जो समाधानी असून ज्याला फक्त परमात्म्याची तळमळ लागली आहे, तो खरा देवाचा आवडता भक्तं.

आपणही असेच बनायचा प्रयत्न करूया.

जय जय रघुवीर समर्थ

– प्रिया शेंडे

मोबाईल नं. 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.