Manobodh by Priya Shende Part 95-मनोबोध भाग 95 – अजामेळ पापी वदे पुत्रकामे

एमपीसी न्यूज :  मनाचे श्लोक क्रमांक 95  – Manobodh by Priya Shende Part 95

अजामेळ पापी वदे पुत्रकामे

तया मुक्ती नारायणाचेनि नामे

शुका कारणे कुंटणी राम वाणी

मुखी बोलता ख्याती जाली पुराणी

 

ह्या श्लोकात पुन्हा एकदा समर्थ आपल्याला रामनामाचा, नामस्मरणाचा (Manobodh by Priya Shende Part 95) महिमा सांगत आहेत आत्तापर्यंत त्यांनी यासाठी अनेक उदाहरणे दिली आहेत. कधी भगवान शंकर तर कधी पार्वती, कधी हनुमंत.ह्या श्लोकात एका राजाचं आणि एका वेश्येचं (गणिका) उदाहरण आपल्याला दिलंय.  पुराणकाळात एक अजामेळ नावाचा अत्यंत दुष्टं, पापी राजा होता.  त्याने त्याच्या आयुष्यात काहीही चांगलं कर्म केलं नव्हतं.

अशा दुष्टं राजाला स्वर्गात जागा मिळणं तर कठीणच होतं. त्याच्या मुलाचं नाव होतं नारायण.  हा राजा वृद्ध झाला.  आजारी पडला तेव्हा नेमका त्याचा मुलगा नारायण त्याच्याजवळ नव्हता. तो जोरजोरात त्याला हाका मारू लागला.  ‘नारायण नारायण’ अशा आर्त स्वरांत त्याला हाका मारू लागला.  अंतकाळ जवळजवळ येत चालला, तसा अजून आर्त स्वरांत तो नारायणचे नाव घेऊ लागला आणि त्या मुलाच्या नावाने हाका मारताना का होईना, त्याच्या मुखातून आर्त स्वरात नारायणाचे म्हणजेच, देवाचे नाम घेतले गेले.

Talegaon Dabhade : बैलगाडा शर्यतीची ग्रामीण संस्कृती आणि परंपरा जपा अन् पुढे न्या -अजित पवार

म्हणून त्याला सद्गती प्राप्तं झाली.कारण काही असो.  नाम कसेही, कुठेही, कधीही घेतले तरी त्याची फळं ही चांगलीच मिळतात. असं समर्थांना सांगायचंय. म्हणून ते म्हणतात की,”अजामेळ पापी वदे पुत्रकामे, तया मुक्ती नारायणाचेनि नामे”.इतका दुष्टं, पापी, एकही सत्कर्म न केलेला राजा,  केवळ मुलाचे नाव नारायण होतं आणि त्याचं नाव घेत घेत पुत्राचीच आठवण करत होता. ते नाम देवाकडे रुजू झालं आणि तो मोक्षाकडे गतिमान झाला.आता दुसरे उदाहरण ते एका वर्षाचं म्हणजे गणिकेचं देत आहेत. हे भागवतातील उदाहरण आहे.

त्या कथेतील वेश्या ही पूर्ण देहाभिमानी आहे नास्तिक आहे. तिला भगवद्भक्तीचा अतिशय तिटकारा आहे.  तिला तिच्या सौंदर्याचा फार अभिमान होता. या अहंकारामुळेच ती वेश्या पूर्णपणे नास्तिक झाली होती. देवाविषयी तिटकारा किंवा अनादर व्यक्त करण्यासाठी तिने मुद्दामच आपल्या शुकाचे म्हणजे पिंजरा बंद पोपटाचे, नाव *राम* ठेवलं होतं ती त्याला नेहमी हाक मारत असे.त्यामुळे नकळतपणे ते राम नाम घेतात. नकळत झालेल्या नामस्मरणाने सुद्धा ती पापी गणिका उद्धरून गेली. तर अशी ही कथा आहे त्यासाठी समर्थ श्लोकात म्हणतात की, “शुका कारणे कुंटणी राम वाणी, मुखी बोलता ख्याती जाली पुराणी”आपण नाम कशासाठीही घेतलं, कसंही घेतलं तरी देखील ते भगवंताला लागू पडतं, आणि त्याचं फळ आपल्याला मिळतंच.

महाशिवरात्रीच्या कथेत पण राजा शिकारीसाठी बेलाच्या झाडावर जाऊन बसतो आणि केवळ चाळा म्हणून एक एक बेलाचे त्रिदल तो खाली टाकतो.  त्या झाडाखाली एक शिवलिंग असतं.  त्यावर एक लाख बिल्व पत्रांचा वर्षाव (Manobodh by Priya Shende Part 95)  राजामुळे होतो आणि नकळत का होईना बिल्वपत्रं वाहिल्यामुळे शंकरजी त्याला प्रसन्न झाले, अशी ही कथा आहे.यावरून आपल्याला लक्षात येईल की सहज, कळत- नकळतपणे जरी आपण नामस्मरण केलं, देवाची भक्ती केली, तरीसुद्धा त्याचं उत्तमंच फळ आपल्याला मिळतं. हेच समर्थांनी ह्या दोन कथांद्वारे आपल्याला सांगितलंय, आणि नामस्मरणाचा मार्ग धरा असा आग्रह ते करताहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.