Manobodh by Priya Shende Part 98 : मनोबोध भाग 98 – हरीनाम नेमस्त पाषाण तारी

एमपीसी न्यूज : मनोबोध भाग 98 – हरीनाम नेमस्त पाषाण तारी- (Manobodh by Priya Shende Part 98)

हरीनाम नेमस्त पाषाण तारी

बहु तारिले मानवी देहधारी

तया रामनामी सदा जो विकल्पी

वदेना कदा जीव तो पापरुपी

या श्लोकात समर्थ नामस्मरणाचा, रामनामाचा महिमा सांगत आहेत. ते म्हणत आहेत की, “हरीनाम नेमस्त पाषाण तारी, बहु तारिले मानवी देहधारी”.  हरी नामाने म्हणजेच परमेश्वराच्या नामस्मरणाने निर्जीव पाषाण, म्हणजे दगड सुद्धा पाण्यावर तरंगतात. ते पण तरतात. तर माणसाचा संसार पण नक्कीच तरून जाईल.

पाषाणाचा संदर्भ अर्थातच रामायणातला आहे.   रावणाने सीतेला लंकेत नेलं, तिला सोडवण्यासाठी, लंकेत जाण्यासाठी समुद्र पार करावा लागणार होता.  तो कसा पार करणार हा मोठा प्रश्न होता. बरेच प्रयत्नं करून झाले. मग त्यासाठी समुद्रात पूल करावा लागेल असं ठरलं. (Manobodh by Priya Shende Part 98)  पण समुद्रात पूल कसा बांधणार? तर वानरांनी त्यात मोठे पाषाण टाकायला सुरुवात केली.  पण ते पाषाण समुद्रात बुडायला लागले.  तेव्हा मारुतीने सांगितलं की सर्वांनी रामनाम घेऊन एक एक दगड टाका.  तेव्हा सर्वांनी रामनाम घेऊन एक एक दगड टाकायला सुरुवात केली, आणि आश्चर्य म्हणजे रामानमामाच्या प्रभावामुळे ते सर्व पाषाण समुद्रावर तरंगायला लागले.  आणि समुद्रावर एक पूल म्हणजेच सेतू तयार झाला.  त्यानंतर श्रीराम आणि सर्व सेना लंकेला पोहोचले.

Alandi : सदगुरु बाबा हरदेवसिंहजी महाराज यांना समर्पित समर्पण दिवस

या कथेचा संदर्भ घेऊन समर्थ आपल्याला सांगताहेत की, (Manobodh by Priya Shende Part 98) रामनामामुळे जड निर्जीव असे पाषाण ते जणू सजीव झाले.  आपण तर सजीव अशी माणस आहोत.  प्रभू आपल्याला ही नक्कीच तारतील.

आपल्याला अनेक उदाहरणांवरून माहिती आहे की रामनामामुळे, नामस्मरणामुळे कित्येक मानवांचा उद्धार झालेला आहे.  बिभीषण, अहिल्या, शबरी, प्रल्हाद, साक्षात हनुमान ही त्यातीलच काही उदाहरणे आहेत.  तेव्हा आपला देखील उद्धार रामनामामुळे होऊ शकतो, असं समर्थांनी सांगितलं आहे.

पुढे समर्थ म्हणतात की, “तया रामनामे सदा जो विकल्पी, वदेना कदा जीव तो पापरुपी”. विकल्प म्हणजे शंका.  सगळे फायदे कळत असूनही मिळणाऱ्या फळाबद्दल शंका असतेच माणसाच्या मनात.  अशा संशयखोर व्यक्तींना समर्थ पापीरूपी असं म्हणताहेत.  रामनामामुळे आपला फायदा होईल की नाही याविषयी त्यांच्या मनात विकल्प म्हणजे शंका निर्माण होते. त्यांच्या मनात साशंकता असते. (Manobodh by Priya Shende Part 98) अशांनाच पापरूपी म्हणजेच पापी म्हटलंय. ज्या माणसांच्या मनात द्वंद्व चालू असतो. मनात संदेह असतो.  कधी हे बरोबर तर कधी ते बरोबर वाटतं, म्हणून त्यांचं मन निर्द्वंव्द होत नाही.  मोकळं होत नाही. सहाजिकच रामनामाकडे त्यांचा ओढा असण्याऐवजी ते ऐहिक सुखात लगेच रमतात आणि आपल्या हातानेच आपला सर्वनाश करून घेतात.  अशा माणसांना समर्थांनी पापी म्हटलंय.  अशा माणसांच्या मुखातून कधीही रामनाम येत नाही, त्यामुळे त्यांचा उद्धारही होत नाही.  यासाठी निःशंक मनाने नामस्मरण सुरू ठेवलं पाहिजे, असं समर्थ सांगत आहेत.

जय जय रघुवीर समर्थ

प्रिया शेंडे

मोबाईल 7020496590 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.