Manohar Joshi : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन

एमपीसी न्यूज –  महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी  यांचं निधन(  Manohar Joshi ) झाले आहे.  ते  87 व्या वर्षाचे होते.  मनोहर जोशी  यांना हृदयविकाराचा झटका आल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मध्यरात्री 3 वाजता मुंबईच्या  हिंदुजा रुग्णालयात   उपचारा दरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. 

Today’s Horoscope 23 February 2024 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मनोहर जोशी हे मूळचे बीडचे. त्यांचा जन्म 2  डिसेंबर 1937 मध्ये रायगड जिल्ह्यातील नांदवी या गावी एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. शिक्षणाच्या निमित्तानं मनोहर जोशी मुंबईत स्थलांतरित झाले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना मुंबई महानगरपालिकेत अधिकाऱ्याची नोकरी मिळाली, त्यानंतर ते मुंबईत स्थायिक झाले.

 

नंतरच्या काळात बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत काम सुरू केलं. 1966 मध्ये शिवसेनेच्या स्थापनेपासून ते शिवसेनेशी संबंधित आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे ते पहिले शिवसेना नेते आहेत.    त्यांनी मुंबई महापालिकेचे नगरसेवक, महापौर, विधान परिषदेचे सदस्य, आमदार,  खासदार, केंद्रीय अवजड उद्योगमंत्री, लोकसभा अध्यक्ष आणि राज्यसभा सदस्य अशा विविध पदांवर काम केलं आहे. मातोश्री वृद्धाश्रम, सैनिक स्कूलची सुरुवात त्यांनी केली. गेल्या काही काळापासून ते राजकारणात सक्रिय (  Manohar Joshi ) नव्हते.

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.