Pimpri News : ‘महाराष्ट्राची सौंदर्यवती’ स्पर्धेची  मानसी प्रभाकर मानकरी

एमपीसी न्यूज – “महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021” या स्पर्धेत पुणे येथील मानसी प्रभाकर हीने प्रथम क्रमांक पटकावला. तर, बीड जिल्ह्यातील अदिती वाघमारे दुसरा क्रमांक  देण्यात आला.

पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिरात नुकताच हा कार्यक्रम झाला. महाराष्ट्रातील महिला व तरुणींसाठी “महाराष्ट्राची सौंदर्यवती 2021 हा महिलांचे सौंदर्य व टॅलेंट यावर राज्यस्तरीय स्पर्धा घेण्यात आली. या स्पर्धेसाठी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातून 35 महिला व तरुणींनी सहभाग घेतला.

स्पर्धेच्या दोन राऊंडमध्ये 35 स्पर्धकातून टॉप 11 काढण्यात आले. सांयकाळी 06.30 वाजता टॉप 11 मधून टॅलेंट राउंड घेण्यात आला. त्यामधून तीन क्रमांक काढण्यात आले. स्पर्धेसाठी सविता कुंभार (मिसेस युनिव्हर्स हॉनेस्टी),पूजा रेड्डी(फॅशन मॉडेल),मधूशा झाळके(मिसेस इंडिया अर्थ फेमस) व पीयूषा काटकर(रन वे मॉडेल)यांनी परिक्षणाचे काम पाहिले.

स्पर्धेतील प्रथम क्रमांक पटकाविणा-यास एक लाख रुपये  पैठणी,  नथ क्राऊन व सासे, दुसऱ्या क्रमांकास 51 हजार रुपये, पैठणी,  नथ क्राऊन व सासे व तिसऱ्या क्रमांकास 21 हजार रुपये पैठणी, नथ क्राऊन व सासे देण्यात आले.

स्पर्धेतील विजेत्यांना महापौर उषा  ढोरे व प्रसिद्ध फॅशन मॉडेल संध्या पांडे यांच्या हस्ते  बक्षीस देण्यात आले.  यावेळी अमोल रोडे,  विशाल लोहीटे उपस्थित होते. कार्यक्रमाचे निवेदन प्रसिद्ध रेडिओ जॉकी आर जे बंड्या यांनी केले. तर प्रस्ताविक बापूसाहेब गोरे व आभार संजय जोगदंड यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.