Monsoon Forecast : आनंदवार्ता ! यंदा देशात सरासरीच्या 98 टक्के पावसाची शक्यता

महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता

एमपीसी न्यूज – हवामान खात्याने पहिला मान्सून अंदाज जाहीर केला आहे. यावर्षी पाऊस 96 ते 104 टक्क्यांपर्यंत राहणार असल्याचे सांगण्यात आलंय. हवामान खात्याने जून ते सप्टेंबर या कालावधीत दीर्घकालीन पावसाचा अंदाज जाहीर केला असून, महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता असल्याचे आयएमडीने सांगितले आहे.

यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. महाराष्ट्रात मागच्या वर्षीही चांगला पाऊस पडला होता. यंदाही त्याहून चांगली परिस्थिती असल्याने शेतकऱ्यांसाठी चांगली बातमी आहे.

ओडिशा, झारखंड, पूर्व ‘यूपी’त कमी पाऊस ओडिशा, झारखंड, पूर्व उत्तर प्रदेश आणि आसाममध्ये सामान्यपेक्षा कमी तर देशातील उर्वरीत भागात सामान्य ते सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

यंदा देशात मान्सूनच्या चार महिन्यांच्या कालावधीत सरासरीच्या 98 टक्के पर्जन्यमानाचा अंदाज आहे. गेल्या दोन वर्षांपासून देशात सामान्यपेक्षा जास्त पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.