Pune News : लालबत्ती परिसरातील महिलांना मूलभूत सुविधा  देण्यास मंथन फाउंडेशन व महा एनजीओ फेडरेशन कटीबद्ध

एमपीसी न्यूज – मंथन फाउंडेशन, महा एनजीओ फेडरेशन व श्रीभगिरथ तापडिया ट्रस्ट  यांच्या संयुक्त विद्यमाने वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी पुण्यातील बुधवार पेठ, लालबत्ती परिसरातील 90 वृद्ध व  एचआयव्हीसह जगणाऱ्या महिलांना पोषक किराणा वाटप करण्यात आले. मंथन फाउंडेशन वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी व मुलांसाठी समुपदेशन, आरोग्य, शिक्षण, सामाजिक समस्या, तांत्रिक शिक्षण व मानसिक स्वास्थ यावर काम करत आहे. 

प्रत्येक महिलेस वर्षभर आवश्यक तो किराणा सुपूर्द करण्याचे अभिवचन पालकत्व महाएनजीओ फेडरेशन संस्थापक शेखर मुंदडा यांनी यावेळी उपस्थितांना दिले.कार्यक्रमाचा प्रारंभ जन गण मन या राष्ट्रगीताने झाला.

या उपेक्षित वंचित घटका सोबत स्वातंत्र्यदिन साजरा करणे म्हणजेच खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य दिन आपल्या समजला असे होते, असे मत झी २४ तासचे  मुख्य संपादक व कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी निलेश खरे यांनी व्यक्त केले.

आजच्या कार्यक्रमामुळे आम्हाला समाजातील वंचित  घटकांपर्यंत पोहचून  सेवा करण्याची संधी  मिळाली, अशी भावना राजेंद्र तापडिया यांनी व्यक्त केली.

75 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्ताने आपण भेटतोय शब्दात काय बोलावे सुचत नाही आहे.सेवा परमोधर्मच्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत आहोत.तिरंग्याचा छत्रछायेखाली आपण सर्व जण आहोत. प्रत्येक रंग आपल्याला एक प्रेरणा देतो. भगवा रंग ऊर्जा, पांढरा रंग शांतता, हिरवा रंग उन्नती ह्या सर्व गोष्टी आपल्याला मिळत राहो हीच शुभेच्छा प्रदान करत महा  एनजीओ फेडरेशनच्या माध्यमातून आम्ही आपल्या सोबत आहोत, असे मत अंजली राजेंद्रजी तापडिया यांनी व्यक्त केले.

महा एनजीओ फेडरेशन सदैव आमच्या प्रत्येक उपक्रमास साह्ययभूत राहत आम्हाला मदत करते याचा आम्हाला मोठा फायदा आमच्या सामाजिक कार्यात होतो. मागील दशकापासून आम्ही लाल बत्ती भागात सामाजिक कार्य करतोय. बुधवार पेठ येथील समस्या मांडता क्षणी शेखर मुंदडा यांनी त्वरित मदत उपलब्ध केली, असे मनोगत मंथन फाउंडेशनच्या अध्यक्षा आशा भट्ट यांनी व्यक्त केले.

महाएनजीओ फेडरेशनचे  कार्यकारी संचालक यांनी महा एनजीओ फेडरेशनच्या सेवा कार्याची भूमिका  यावेळी उपस्थितांपुढे विषद केली.

यावेळी मंथन फाउंडेशनचे अध्यक्षा आशा भट्ट व दीपक निकम व महा एनजीओ फेडरेशनचे ज्येष्ठ संचालक मुकुंद शिंदे,  अमोल उंबरजे, राहुल पाटील, शशांक  ओंभासे, प्रणिता जगताप, गणेश बाकले व अक्षयमहाराज भोसले उपस्थित होते. सामाजिक क्षेत्रातील मान्यवरांपैकी  सोशल  रिस्पॉन्सब्लीटीचे  विजय वरुडकर व आर्ट ऑफ लिविंगचे महेश सोनी आदी मान्यवर उपस्थित होते.

मंथन फाउंडेशन चे सर्व कार्यकर्ते  वृषाली गोरे, गणेश खेडेकर, आरती गणूरे व सर्व पियर एडूकेटर यांच्या मेहनती मुळे कार्यक्रम यशस्वी झाला.

फेडरेशनच्या ४ थ्या वर्धापन दिनी आवास्तव इतर खर्च  न करता सामाजिक कार्याचा बहुमूल्य संदेश  महा  एनजीओ फेडरेशनने आपल्या कार्यातून दिला वंदे मातरमच्या सामूहिक गायनाने कार्यक्रमाचा  समारोप झाला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.