Mararashtra Corona Update: दिवसात 2345 नवे रुग्ण, 1408 जणांना डिस्चार्ज तर 64 मृत्यू, सक्रिय रुग्ण 28454!

Mararashtra Corona Update: 2345 new patients a day, 1408 discharged and 64 deaths, 28454 active patients!

एमपीसी न्यूज – राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 41 हजार 642 झाली आहे. काल (गुरुवारी) 2345 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. राज्यात काल 1408 कोरोनाबाधित रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात 11 हजार 726 रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात सध्या 28 हजार 454 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या 3 लाख 19 हजार 710 नमुन्यांपैकी 2 लाख 78 हजार 68 जणांचे प्रयोगशाळा नमुने कोरोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 41 हजार 642 जण पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात 4 लाख 37 हजार 304 लोक होम क्वारंटाईनमध्ये असून 26 हजार 865 लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात 64 करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली असून एकूण संख्या 1454 झाली आहे. आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबई मध्ये 41, मालेगाव 1, पुण्यात 7, औरंगाबाद शहरात 3, नवी मुंबईमध्ये 2, पिंपरी- चिंचवड -1 तर सोलापुरात 1 मृत्यू झाला आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी 36 पुरुष तर 28 महिला आहेत. आज झालेल्या 64 मृत्यूपैकी 60 वर्षे किंवा त्यावरील 31 रुग्ण आहेत तर 29 रुग्ण हे वय वर्षे 40 ते 59 या वयोगटातील आहेत. तर 4 जण 40 वर्षांखालील आहे. या 64 रुग्णांपैकी 38 जणांमध्ये ( 59 टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत.

राज्यातील जिल्हा व मनपानिहाय रुग्णांचा आतापर्यंतचा तपशील:(कंसात मृत्यूंची आकडेवारी)

मुंबई महानगरपालिका: 25,500 (882)

ठाणे मंडळ एकूण: 31.851 (996)

नाशिक मंडळ एकूण: 1,425 (94)

पुणे मंडळ एकूण: 5,371 (264)

कोल्हापूर मंडळ एकूण: 357 (5)

औरंगाबाद मंडळ एकूण: 1297 (40) 

लातूर मंडळ एकूण: 178 (6) 

अकोला मंडळ एकूण: 641 (34)

नागपूर मंडळ एकूण: 474 (7)

इतर राज्ये: 48 (11)

एकूण: 41 हजार 642 (1454)

राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजना अंमलात आणण्यात येत आहे. राज्यात सध्या 1949 कंटेनमेंट झोन क्रियाशील असून आज एकूण 15 हजार 894 सर्वेक्षण पथकांनी काम केले असून त्यांनी 64.89 लाख लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.