Pune: वडेट्टीवार हटवा, सारथी टिकवा; मराठा क्रांती मोर्चाची मागणी

Maratha kranti morcha demands to remove vijay vadettiwar मराठा समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे मत यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

एमपीसी न्यूज- मराठा क्रांती मोर्चाने बहुजन कल्याण विभाग आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना हटवण्याची मागणी करण्यात आली. सारथी संस्थेच्या स्थितीला वडेट्टीवार जबाबदार असल्याचे मराठा क्रांती मोर्चाचे म्हणणे आहे. त्यांनी महसूलमंत्री आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांना अडवण्याचा प्रयत्न केला. यावेळी थोरात यांनी संबंधितांना भेटून चर्चा करण्याचे आश्वासन दिले.

पुण्यात आज काँग्रेसतर्फे पेट्रोल आणि डिझेल दरवाढीच्या विरोधात आंदोलन केले गेले. या आंदोलनात प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यासह काँग्रेसचे नेते सहभागी झाले होते.

यावेळी आंदोलन झाल्यावर निघताना थोरात यांच्यासमोर फलक धरून काही कार्यकर्ते उभे राहिले. थोरात यांनी त्यांची काही सेकंद भेट घेत पुढे जाणे पसंत केले.

मराठा समाजाच्या विकासासाठी तयार करण्यात आलेल्या सारथी संस्थेला सरकार पुरेशी मदत करत नसल्याचे मत यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने व्यक्त करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.