PimpleGurav : पालखी सोहळ्यातील सेवेबद्दल छावा मराठा संघटनेतर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांचा सत्कार

एमपीसी न्यूज – जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये आरोग्य विभाग, पाणी पुरवठा विभाग आणि विद्युत विभागाने चांगले काम केले. या कर्मचाऱ्यांना चांगल्या कामाबद्दल प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने छावा मराठा संघटनेच्या वतीने या कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. छावा मराठा संघटनेचे पुणे जिल्हाध्यक्ष तथा कोकण संपर्कप्रमुख रामभाऊ जाधव आणि संजय गांधी निराधार योजनेच्या सदस्य अदिती निकम यांच्या हस्ते या कर्मचाऱ्यांना सन्मानित करण्यात आले.

यावेळी छावा मराठा संघटनेचे शुभम गवळी, सुनील सावंत, निलेश शेवाळे, रमेश पाटील, नाना शिंदे, बंडू मोरे, आरोग्य निरीक्षक सुनील चौहान, दीपक माकर, रमेश जगताप, आनंदा कांबळे, शैलेश हाके, राजाराम राखपसरे, कन्हैय्या चंडलिया, रेखा गोहर, मंगल आरडे, नंदा ओव्हाळ, सागर कांबळे आदी उपस्थित होते.

रामभाऊ जाधव म्हणाले, जगद्गुरू संत तुकाराम महाराज व संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात लाखो वारकरी सहभागी असतात. दरम्यानच्या काळात परिसराची स्वच्छता, वारकऱ्यांना पिण्याच्या पाण्याची सुविधा, तसेच वीजपुरवठा चोख पुरवून त्यांची गैरसोय टाळून चांगली सेवा हे कर्मचारी देतात. त्यांचा उचित सन्मान करून प्रोत्साहन देण्याचे काम समाजाने केले पाहिजे, असेही रामभाऊ जाधव यांनी सांगितले.       आदिती निकम म्हणाल्या, वारकऱ्यांची सेवा केल्याने मोठा आनंद मिळतो. वारकऱ्यांची सेवा म्हणजे एकप्रकारे पंढरीची वारी केल्याचेच समाधान मिळते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.