Maratha Reservation : भुजबळ – जरांगे पाटील यांनी वाद जास्त प्रमाणात वाढवू नये – संजय काकडे

एमपीसी न्यूज – मराठा समाजाला आरक्षण ( Maratha Reservation) मिळावे, यासाठी भाजप सरकारचे प्रामाणिक प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर जेष्ट मंत्री छगन भुजबळ आणि मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील वाद जास्त प्रमाणात वाढू नये, अशी अपेक्षा भाजपचे राज्यसभेचे माजी खासदार संजय काकडे यांनी व्यक्त केली.

संजय काकडे म्हणाले, मराठा आरक्षणासाठी 4 तज्ज्ञ घेऊन जावे, आमचे संपूर्ण मंत्रिमंडळ चर्चा करायला तयार आहे. 24 तारखेचा अलटीमेटम देण्यापेक्षा मराठा आरक्षण कसे देता येईल यासाठी प्रयत्न करावे. भुजबळ यांनी ओबीसी तर, जरांगे पाटील यांनी मराठा तरुणांची डोकी भडकवू नये. मागील वेळेस मराठा समाजाचे मोर्चे निघाले. त्यावेळी 10 महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्यात. त्याचा मतदानावर काहीही परिणाम झाला नाही. नांदेड सोडले तर, 9 महापालिकेत तत्कालीन सत्ताधारी भाजप – शिवसेनेने विजय मिळवला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांना 8 ते 10 जागा, शिवसेना ( शिंदे गट) 12 ते 13 जागा लढणार आहेत. या दोघांचे मिळून 22 ते 23 जागा जाणार आहेत. भाजप या उमेदवारांचा प्रचार करणार आहे. यापूर्वी शिवसेना (उद्धव ठाकरे गट) यांच्या उमेदवारांचा प्रचार करीत होतो.

आमच्या घटक पक्षाचे उमेदवार विजयी होण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आमचं चिन्ह वापरायचे की नाही, हा त्यांचा अधिकार आहे. जरांगे पाटील सध्या मराठा आरक्षणसाठी चांगले काम करीत आहे. राजकीय लोकांना बंदी आणणे, छगन भुजबळ यांच्यावर टीका करणे, असे काम करू नये.

Thergaon : पीएमपी बस प्रवासात महिलेचा लॅपटॉप चोरीला

मराठा आंदोलन शांतपणे करावे. भुजबळ आणि जरांगे पाटील वाद जास्त प्रमाणात वाढू नये. दोन्ही समाजात जातीय तेढ निर्माण होईल, असे दोन्ही नेत्यांनी बोलू नये. भुजबळ यांचा अभ्यास महत्वपूर्ण आहे. 2019 ला देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मराठा आरक्षण दिले होते. भाजपच आरक्षण देऊ शकते, याचा मला विश्वास आहे.

एकनाथ शिंदे आणि अजित पवार मराठा आहेत. तर, देवेंद्र फडणवीस मराठा प्रेमी आहेत. घटनेच्या चौकटीतच आरक्षण द्यावं ( Maratha Reservation) लागेल. त्यासाठी जरांगे पाटील यांनी मंत्रालयात यावे, चर्चा करावी. मराठा आरक्षण कसे टिकून राहील यासाठी सुचवावे. केवळ आंदोलन करणे बरोबर नाही, असेही काकडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.