Maratha reservation : मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर राजीनामा देईन – तानाजी सावंत 

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणाबाबत केलेल्या विधानानंतर चर्चेत आलेले राज्याचे आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी मराठा समाजाची जाहीर रित्या माफी मागितली आहे.(Maratha reservation) इतकच नाही तर 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मंत्रिपदाचा राजीनामा देईन आणि मराठा आंदोलनात सहभागी होईल अशी घोषणाही त्यांनी यावेळी केली.

एका जाहीर कार्यक्रमात बोलत असताना तानाजी सावंत यांनी मराठा आरक्षणाची खाज सुटली असे विधान केलं होतं. मराठा समाजाकडून ओबीसी किंवा अनुसूचित जाती प्रवर्गातून आरक्षण द्या अशी मागणी केली जात आहे. या सगळ्यांचा करता करवीता कोण आहे हे तुम्हा आम्हाला समजणे गरजेचे आहे.(Maratha reservation) हे सर्वांना माहीत आहे परंतु याविषयी कोणीही काहीही बोलत नाही. दोन वेळा आरक्षण केल्यानंतर मराठा समाज गप्प राहिला. आता मात्र सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाज सुटली असं विधान तानाजी सावंत यांनी केलं होतं. या विधानानंतर त्यांच्यावर टीका केली जात होती.

Raigad fort : किल्ले रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा द्वितीय राज्याभिषेक उत्साहात

यावर आता तानाजी सावंत यांनी जाहीर रित्या माफी मागितली आहे. सावंत म्हणाले मी एक लाख वेळा मराठा समाजाची माफी मागायला तयार आहे.(Maratha reservation) पाळण्यातल्या बाळापासून ते 90 वर्षाच्या व्यक्तीपर्यंत माफी मागायला तयार आहे. माझा समाज आहे मला माफी मागायला काही वाटणार नाही. इतकच नाही तर 2024 पर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळालं नाही तर मी राजीनामा देईन आणि मराठा मोर्चात सहभागी होईल असेही ते म्हणाले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.