Maratha Reservation : मनोज जरांगे यांची यांची प्रकृती अधिक खालावली; नाकातून रक्तस्त्राव, पोटदुखीचा त्रास वाढला

एमपीसी न्यूज : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे (Maratha Reservation) यांनी अंतरवली सराटी येथे पुन्हा एकदा उपोषणास सुरुवात केली. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून त्यांची तब्येत बिघडल्याचे समोर आले आहे. त्यांच्या नाकातून रक्तस्त्राव झाल्याचेही समजले असून त्यांनी डॉक्टरांकडून उपचार घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्या पोटातही दुखू लागले आहे. 

गेल्या पाच दिवसांपासून त्यांनी अन्न-पाणी सोडून दिल्याने त्यांची प्रकृती आज अधिकच बिघडली आहे. जरांगे यांच्या नाकातून रक्त येत असल्याची बातमी मिळताच पोलिस अधिकाऱ्यांनीही त्यांना पाणी पिण्याची विनंती केली, पण त्याचा काही उपयोग झाला नाही.

Rajya Sabha Election : भाजपच्या राज्यसभा उमेदवारीत मागून येऊन अशोक चव्हाण यांची वर्णी; पुण्यातून मेधा कुलकर्णी यांना संधी

मंगळवारी त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांना बोलण्यासही त्रास होत होता. त्यांची प्रकृती सातत्याने खालावत असल्याने प्रशासन चिंतेत आहे. अन्न व पाण्याअभावी ते कमालीचे अशक्त  झाले आहेत. ग्रामस्थ व इतर सहकारी त्यांना पाणी पिऊन उपचार करण्याची  (Maratha Reservation) वारंवार विनंती करत आहेत. परंतु, त्यांनी सर्वांना नकार दिला आहे. त्यामुळे वाढती परिस्थिती पाहता खबरदारीचा उपाय म्हणून बीडमध्ये जिल्हा प्रशासनाकडून कलम 144 लागू करण्यात आले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.