Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठी एकानेही जाळपोळ , आत्महत्या करायची नाही- मनोज जरांगे पाटील

एमपीसी न्यूज – आज ( दि..20 रोजी ) आळंदी येथे पहाटे अडीच वाजता मनोज जरांगे ( Maratha Reservation) पाटलांचे भव्य पुष्पहारात व पुष्पवृष्टीत सकल मराठा समाज   यांच्या वतीने स्वागत करण्यात आले. हजारो सकल मराठा समाज बांधवांच्या उपस्थित त्यांची भव्य मिरवणूक हरी नामाच्या गजरात चाकण चौक ते छत्रपती शिवाजी महाराज स्मारकापर्यंत काढण्यात आली. पहाटे तीन सव्वा तीन वाजता आळंदी येथील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या  येथे त्यांची सभा पार पडली.

Railway : अजमेर उरुसानिमित्त पुणे ते अजमेर विशेष रेल्वे

यावेळी ते म्हणाले , आळंदी नगरीतील परिसरातील जमलेल्या सर्व भक्त गणांना माझा जय शिवराय. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पावन भूमीत इतक्या रात्री आपण एकत्र आलात त्याबद्दल तुमचं मनापासून कौतुक.आज या नगरीत एक नवीन आशीर्वाद मिळाला. हे अपेक्षित नव्हतं. इतक्या रात्री प्रचंड संख्येने असाल हे वाटलं नव्हतं. संतांच्या भूमीन सुद्धा इथल्या पहाटेच्या पहरी आशीर्वाद दिला, म्हणजे आरक्षण 100 टक्के पदरात आहे. आळंदी नगरी आशिर्वाद देऊन संसार फुलवते.
जगाच्या पाठीवर सगळ्यात जास्त संत मंडळी हिंदू धर्माची संस्कृती टिकवतात.या पवित्र भूमीत इतकं प्रचंड कौतुक ,स्वागत झालं त्याबद्दल मनापासून आभार.पहिल्यादा असं घडलं याच्या अगोदर  घडले असेल माहीत नाही. एव्हढ्या मोठ्या प्रमाणात मराठ्यांची सुनामी आली. त्याच्यात आपलं क्षेत्र म्हणजे ना कोणाच्या राजकीय व्यासपीठावर जात ना कोणाच्या सामाजिक व्यासपीठावर .वारकरी संप्रदाय या दोन्ही जागेवर कधीच जात नाही. परंतु हे पहिल्यांदा घडलं.
या राज्यातला एक ही महंत असे नसतील ते मराठा आरक्षणावर बोलत नसतील. हा लढा सगळ्यांनीच उचलून धरलाय.देवाने सुध्दा. आपण तर त्यांचे शिष्य आहोत.आपण तर उचलून धरणारच.परंतु त्रास होईल हे मंजूर आहे. महाराज मंडळी ज्या ज्या वेळेस समाजाच्या पाठीशी उभी राहतात, आशीर्वाद म्हणून त्यावेळी काहींच्या पोटात सुद्धा दुखेल ,दुखू द्या.थोडासा त्रास होईल.
संत तुकाराम महाराजांना,संत ज्ञानेश्वर महाराजांना माउलींना सुद्धा लोकांनी सोडलं नाही.तुम्हाला का सोडणार आहे. म्हणून त्रास झाला तर होऊ द्या.एक दोन महाराजांवर केस झाल्या कळालय मला. मला मोकळं झाल्यावर पाहू.महाराजांनी आता बोलायचं सुध्दा नाही,गोर गरीबाला न्याय द्यायचा म्हणून. उद्या कीर्तन बंद पाडतील. मग आपल्याला टाळ कशाला दिलाय?दोन्ही काम करता येतात त्याने.
गाथेत दोन्ही गोष्टी सांगितल्यात जास्त शांत बसू नका,लोक जगू देणार नाहीत.आपल्या ( Maratha Reservation) लेकरांच्या न्यायासाठी सगळा संप्रदाय उठला .तुमचं पाहून राना वनात कष्ट करणारा समाज ही पेटवून उठला आहे.कारण हे क्षेत्र या क्षेत्रात उतरत नाहीत.ते क्षेत्र उतरले त्यामुळे सामान्य मागे राहायला तयार नाहीत.ते ही तुमच्या पुढे पळायला लागलेत.
पुन्हा पुन्हा ते सांगतो थोडासा त्रास होईल तुम्हाला. होऊ द्या.पण गोर गरिबांच्या लेकराला न्याय द्या.कारण तुम्ही ही न्याय देण्यासाठीच कल्याणसाठीच  गावा गावा मध्ये जनजागृती करत असता. एखाद्याच्या लेकराला आयुष्याची भाकरी मिळाली.त्यापेक्षा दुसरं पुण्य कोणचे .म्हणून सगळेच्या सगळे  महाराज मंडळी सुद्धा या समाजाच्या पाठीशी उभी राहिली. आम्ही सहज म्हणलो होतो 40 दिवसाचा सप्ताह करायचा.इतके महाराज आले महाराज पहायला गाव जमा झाले. हे पहिल्यांदा घडलं.इतकं प्रेम त्यांचं मिळालं. त्यांना चीड लक्षात आली. अन्याय लक्षात आला ते तुटून पडले.आळंदीच्या या नगरीतून महाराष्ट्रातील  सर्व महाराज मंडळीला विनंती करतो असेच पाठीशी रहा.
तसेच आंदोलनाविषयी सांगताना ते म्हणाले,  कायद्याच्या आधीन राहून सर्व नियमांचे पालन केलं होतं.आमरण उपोषण इतकं शांततेत आंदोलन या देशात असू शकत नाही. आमचं पूर्ण गाव उपोषणास बसले होते.आमच्यावर सरकारनी इतक्या भ्याड हल्ला केला. की त्या माता माऊलींच्या डोक्याच्या चिंधड्या चिंधड्या झाल्या.एका एकाच्या डोक्याला खूप टाकले पडले, यावरून कसे डोके फुटले याचा अंदाज करा . पण एकही माणूस मागे हलला नाही.मुलांच्या पोटात अजून ही गोळ्या आहेत. इतके निर्दयी सरकार आमच्या ( Maratha Reservation) जीवनात पहिल्यांदा पाहिले. तुम्ही आमच्या पोरांना मारलं असत तर काही वाटलं नसत.पण त्या निष्पाप माता माउलींनी काय केलं होतं.
त्यांचे हात पाय मोडले.न्यायासाठी स्वतःच्या लेकरांच्या शांततेत लोक त्यांना मोडून काढण्याचे काम तुम्ही केलं. आज काही लोकांना चालता येत नाही.तेथील घटनेची  परिस्थितीची पूर्ण  माहिती यावेळी दिली.आज ही महाराष्ट्रातील काना कोपऱ्यातील मराठा समाज एकजुटीने उभा आहे. करोडो च्या संख्येने. माय बाप मराठ्यानो इतका मार खाऊन शांततेच आंदोलन केलं.तुम्ही शांततेत करा .महाराष्ट्रातील महंत मंडळींना त्यांना जरी त्रास झाला तरी या समाजासाठी सहन करा. पुढे दिवस आपले सुध्दा आहेत. आपल्याला लढाई आता जिंकायची.
इथं आल्या नंतर तुमच्यातील जोश पाहून मला काय करावं ते कळेना.इतक्या शांत भूमीत पवित्र भूमीत सगळे महंत एवढा जोश असेल वाटलं नव्हतं एव्हढा जोश पाहिल्यावर भूक लागली नाही.तसेच त्यांनी यावेळी त्यांच्या शरीराची परिस्थिती व दिनचर्या व्यस्त दौऱ्या विषयी माहिती दिली. आरक्षण महत्त्व यावेळी स्पष्ट केले.29 लाख नोंदी सापडल्या यावेळी सांगितले. सरकार 24 तास आरक्षण संदर्भात काम करतय. 100 टक्के मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे.कारण ओ बी सी आरक्षणा चे सगळे पुरावे निकष कायदा पारित करण्यासाठी मिळालेत.प्रथम अहवाल सरकारने स्वीकारला आहे. आता फक्त दुसरा अहवाल स्वीकारणं बाकी आहे.असे ही त्यांनी सांगितले.

सध्याची राज्याची परिस्थिती अशी आहे ज्या ठिकाणी कार्यक्रम आहे त्याठिकाणी नोकरदारवर्ग सुद्धा नोकरीला जायला तयार नाही. पूर्ण दिवस वाट पाहतो.सामान्य मराठा,व्यवसायिक मराठा आणि शेतकरी मराठा हा शेताकडे जात नाही. एक दिवस पूर्ण ताकदीने एक झाले.कारण तसं आहे आपल्या हक्काच असताना दिले नाही .आपल्या विरोधात एकजूट करून मराठ्यांच्या विरोधात जातीय दंगली होतील अशी वक्तव्य करायला सुरुवात केली.त्यामुळे मराठा जास्तच एकजूट झाला.
मराठ्यांना त्यांनी  डिवचायला नको होते.त्यांनी डिवचले.त्यामुळे राहिलेला मराठा सुद्धा एक झाला. आरक्षण गेलं हे त्यांना माहीत झालं.ते हक्काचे आहे ते त्यांना द्यायचे नाही. ते बसलेत घटनेच्या पदावर. कायदा पायदळी तुटवायला लागलेत.घटनेच्या पदावर बसलेल्या माणसाकडे कायद्याच पालकत्त्व असत.त्याला कायदा पाया खाली तुडवता येत नाही.राजद्रोहासारखा गुन्हा त्यांनी केलाय. इतके भयानक वक्तव्य त्यांनी केलेत.मी सहन केले नसते.पण माझा नाईलाज झाला आहे.
मला माहित आहे, 24 डिसेंबर ला विजयाचा सुवर्ण दिवस मराठ्यांचा ,सुवर्ण क्षण येणार आहे.आणि त्यांनी या राज्यात घाटच घातलाय जातीय दंगली झाल्या पाहिजेत. वातावरण बिघडले पाहिजे.म्हणून आता आपण संयमाने घेतलं पाहिजे.आपल्या लेकरांच्या तोंडाला आलेला घास जाता कामा नये.त्यांचा हातात दुसरं काही नाही.
राजकीय  स्वार्थापोटी व फायद्यासाठी राज्यात गावा गावात मराठा व ओ बी सी समाजात दंगली भडकवून आणायच्या.किंवा मराठ्यांना अपमान होईल असे बोलायचे.मराठा रोषात येऊन काही तरी करेल .हा उद्देश त्यांचा आहे. तो उद्देश सफल होऊ द्यायचा नाही.24 डिसेंबर पर्यँत शांत रहायचं.या ध्येयावर ठाम राहायचं.मी न सहन करणारा आहे. आरक्षणा च्या विरोधात कोणीही बोले तर मी सोडत नाही.
 लेकरांचे कल्याण होणार आहे. त्यामुळे त्यांना कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. त्यांच्या कडे दुसरा पर्याय नाही. नोंदी सापडल्या म्हणजे आता आरक्षण द्यावा लागेल. तर पर्याय काय ?जातीय तेढ निर्माण करायचा.आपला राजकिय फायदा त्यातून करून घ्यायचा आणि ओ बी सी बांधवात व मराठ्यां मध्ये वाद किंवा झुंज लावून द्यायची.ग्रामीण भागातील प्रत्येक ओबीसी बांधवांच म्हणणं आहे.
जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असल्या तर तो ओबीसी मध्ये त्याला आरक्षण.गोर गरीब मराठ्याला आरक्षण दिल पाहिजे.आपल्या( त्यांच्या) नेत्यांनी थोड शांत राहिला पाहिजे. कारण खर ते खरं.त्या दम निघेना त्यांचं झालंय वय .त्याला काय सुधराणा काय म्हणावं.वैचारिक विरोध असला पाहिजे. वैचारिक मत भेद असले पाहिजे.परंतु जो कायद्याच्या पदावर बसला आहे.
त्याने कायद्याची गरीमा राखली पाहिजे.जो माणूस व्यक्तव्य च विचित्र करायला लागला.अगोदर भुजबळ साहेबांना मानत होतो.व्यक्ती म्हणून हुशार आहे. प्रचंड सत्तेचा अनुभव आहे. 30 -32 वर्ष सत्तेत राहून मुरबी नेता म्हणून राज्याचा होता. वैचारिक त्यांचे आमचे विरोध होते.व्यक्ती म्हणून त्या माणसाला आमचा विरोध कधीच नव्हता आणि मराठ्यांचा विरोध असण्याचे कारणच नाही.त्यांच्या विचारला आमचा विरोध होता.कडाडून विरोध करत होतो व करत राहणार.काल त्यांना मराठ्याला टोकरायची गरज नव्हती.
गप्प बसायला पाहिजे होते.आम्हाला टोकरल तर आम्ही कोणते शहाणे आहे. आमच्या वाटेला जायची काय गरज आहे का? तरी आम्ही शांत आहे. होऊ द्या ,काय असत वयामानाने माणसाला काही सुधारतं नाही.त्याने अश्या गोष्टी होतात.एकदा आरक्षण मिळू द्या .त्यांची स्वप्न पूर्ण होऊ द्यायचे नाही.मराठ्यांनी सर्व राज्यात वार्ता फिरवायची एकमेकांना ,एकाने ही उद्रेक जाळ पोळ करायचा नाही.मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करायची नाही.यांचा डाव यावेळी यशस्वी होऊ देऊ नका.तसेच यावेळी त्यांनी आरक्षण संदर्भात मागे सरकारला का वेळ दिला. आता का दिला याविषयी माहिती दिली.
तसेच त्यांनी संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समधीचे दर्शन ( Maratha Reservation) घेतले. यावेळी विश्वस्त विकास ढगे पाटील उपस्थित होते.त्यांचा यावेळी देवस्थान च्या वतीने सन्मान करण्यात आला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.