Maratha Reservation : मराठा आरक्षणासाठीच्या उद्या होणाऱ्या महाराष्ट्र बंदला स्थगिती

मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांची माहिती

एमपीसी न्यूज – मराठा आरक्षण समितीच्या वतीनं मराठा आरक्षणासह शनिवारी (दि. 10 ऑक्टोबर) महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. मात्र सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद मागे घेत असल्याची माहिती मराठा सकल महासंघाचे अध्यक्ष सुरेश पाटील यांनी दिली आहे.

या संदर्भात काल रात्री उशीरा सह्याद्री अतिथीगृहावर बैठक घेण्यात आली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, अनिल परब, विजय वडेट्टीवार उपस्थित होते.

या बैठकीत झालेल्या चर्चेनंतर सरकारने अनेक मागण्या मान्य केल्याने उद्याचा बंद आम्ही मागे घेत आहोत. अशी घोषणा सुरेश पाटील यांनी केली आहे.

या सविस्तर बैठकीमध्ये पुढील मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत.

अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ विकास महामंडाळासाठी 400 कोटी

सारथी साठी 130 कोटी

शैक्षणिक शुल्क फी साठी 600 कोटी

मराठा महासंघाच्या मोर्चातील दाखल केलेले गुन्हे मागे घेणार

मराठा क्रांती मोर्चात बलिदान दिलेल्या मुलांच्या कुटुंबातील एकाला नोकरी

मराठा आरक्षणाच्या बाबत वकील लावून आम्ही आरक्षण मिळवून देण्याचा प्रयत्न करणार, स्टे उठवून देणार

इडब्लूएस आरक्षण आणि नोकरभरतीसाठी एक महिन्याची मागणी मान्य

एमपीएससीच्या विद्यार्थांच्या परीक्षेबाबत जोपर्यंत स्टे आहे, तोपर्यंत केंद्रातले दहा टक्के लागू करण्याची मागणी मान्य करण्यासाठी एक बॉडी तयार करुन निर्णय घेतला जाणार, त्यासाठी एक महिन्याची मुदत मागून घेतली

आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात
मराठा आरक्षण स्थगितीविरोधात आजपासून ठोक मोर्चाला सुरुवात झाली आहे. तुळजापुरात महिला मोर्चाचं आयोजन करण्यात आले आहे. या मोर्चाला खासदार संभाजीराजे छत्रपतींसह राज्यभरातील समन्वय उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.