Pune : मराठा आरक्षण, पुण्यात आज आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर ठिय्या

एमपीसी न्यूज – राज्यभरात मराठा आरक्षण प्रश्न चांगलाच पेटला आहे. परळीमध्ये सुरू झालेल्या ठिय्या आंदोलनाने आता राज्यभर आक्रमक रूप धारण केल आहे. अनेक ठिकाणी हिंसेचा आगडोंब उडाला असताना आता या आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणजे लोकप्रतिनिधी आणि मंत्र्यांच्या घर,कार्यालयासमोर मराठा आंदोलन ठिय्या देऊन घोषणाबाजी करत आहेत.

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून आरक्षणासाठी रस्त्यावर उतरलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलकांनी पुढील मोर्च्यासाठी रस्त्यावर आंदोलन न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच राज्यात जो हिंसाचार झाला त्याचा क्रांती मोर्चाशी संबंध नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. यापुढे मागण्यांसाठी राज्यभर ठिय्या आंदोलन करण्याचा त्यांनी निर्णय घेतला आहे. याच निर्णयाच्या पार्श्वभूमीवर पुण्यात आज आमदार योगेश टिळेकर यांच्या घरासमोर मराठा बांधवांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.