अशी असते घराणेशाही…..

(हर्षल विनोद आल्पे)

एमपीसी न्यूज- सध्या देशात निवडणुकीचे वारे आहे. या निमित्ताने सगळीकडे घराणेशाहीबद्दल चर्चा ऐकायला मिळतीये. घराणेशाही म्हणजे नेमके काय आहे, ती फक्त राजकारणातच असते का ? सर्वसामान्यांच्या घरात देखील घराणेशाहीची बीजे दिसून येतात. पण चर्चा होते ती फक्त राजकीय घराणेविषयी.

सहज एक व्हिडिओ नुकताच पाहण्यात आला. ती एका राष्ट्रीय पक्षाच्या अध्यक्षाची मुलाखत होती. अन ती ही अमेरिकेतली. त्यात त्यांना घराणेशाहीबद्दल एक मार्मिक प्रश्न विचारण्यात आला की तुम्ही मोठ्या घराण्यातून येता तर तुमच घराणेशाहीबद्दल काय मत आहे ? त्यावर त्यांनी उत्तर दिले की, आपल्या भारतात थोड्या फार फरकाने सगळीकडेच घराणेशाही आहेच कि त्यात नवीन ते काय ? मग तुम्ही मला हा प्रश्न का विचारता आहात ? मी एकटा थोडाच आहे ? अनेक जण आहेतच कि ज्यांना आपल्या घराण्यामुळे फायदा झालाय.

त्या नेत्याच मत ऐकून जरा विचारातच पडलो. भारत हा फक्त घराणेशाहीवरच चालतो की काय ? या प्रश्नावर तो नेता काहीच न बोलता फक्त हसला. काय बोलणार म्हणा ! खरतर भारताला स्वातंत्र्य मिळाल तेव्हा जी काही संस्थान होती ती सगळी खालसा करण्यात आली. या घराण्यांसाठी पूर्वीच अस काही राहील नाही. ती घराणी आता वेगळ्या रुपात आपल अस्तित्व शोधत असतील. त्यात काही चूक असण्याच काही कारण नाही. ही मानवी वृत्ती आहे. एकदा सत्ता गाजवायची सवय लागली कि ती तशी पिढ्या न पिढ्या दिलीही जात असेल कोण जाणे ? पण ! हा घराणेशाहीचा उगम होतो कसा, हे देखील जाणून घ्यावंच लागेल. घराणेशाही ही काही फक्त मोठ्या, श्रीमंत कुटुंबातच असते असेही नाही. तुमच्या- माझ्या कुटुंबात ही ती वास करतेच. आई अथवा वडिलांचा व्यवसाय मुलाने अथवा मुलीने करावा अशी अपेक्षा केली जाते. त्यामुळेच “बाळा तू मोठेपणी कोण होणार ?” या प्रश्नाचे उत्तर आपलाच व्यवसाय त्याने करावा याच उत्तराची त्याच्याकडून अपेक्षा ठेवली जाते.

माझ्या लहानपणची एक गम्मत आठवते. माझे वडील मोठे गायक आहेत अन आमच्या तीन पिढ्या या संगीत क्षेत्रात आहेत .तीच अपेक्षा माझ्याकडून केली जायची ,मी मात्र वेगळ ध्येय सांगितल्यावर प्रश्न विचारणाऱ्याचा भ्रमनिरास व्हायचा. कशावरून आम्ही सुद्धा राजकीय लोकांकडून घराणेशाहीची अपेक्षा करत नाही ? आम्ही त्यांना मुलाखतीमध्ये प्रश्न विचारतोच की “तुमच्या मुलाला राजकारणामध्ये काही आवड वगैरे” फार कमी राजकीय मंडळी असतात जी ठामपणे नाही सांगतात ! कौतुक त्याचं वाटत …

आजच्या या जगात जेव्हा वडील मुलासाठी तिकीटापासून ते मतांपर्यंत सर्व काही मागत असतात तिथे माझे अपत्य यात येणारच नाही असे म्हणणे फारच धाडसाचे असते. अहो ! सत्ता कुणाला नको असते !

अशीही उदाहरण असतीलच की जे सुरवातीला म्हणाले पण नंतर आलेच की. जबाबदारी पडली म्हणून म्हणा किवा सत्तेची सवय लागली म्हणून म्हणा किवा काहीच न जमल्यामुळे राजकीय क्षेत्रात येताना दिसतात. मग आम्ही त्या नेत्याची तुलना करायला लागतो. आम्ही त्यांना वेळच देत नाही. लगेच टिंगल सुरु. त्यांनी तयारी करून यायला हवीच. ज्यांना राजकारणात यायचे असेल त्यांनी तयारी करायला हवीच. नाहीतर आपल हसे होऊ शकत. कदाचित एकदा तुम्हाला निवडणुकीत यश मिळू शकेल. पण पुढच्या वेळी ते टिकवण्यासाठी फार मेहेनत घ्यावी लागते. प्रत्येक क्षेत्रात हेच आहे हे मोठ्यांच्या चरित्रावरून दिसून येते

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.