BNR-HDR-TOP-Mobile

चित्रपट “ तुंबाड “ अद्भुतरम्य, अप्रतिम,,,,

288
PST-BNR-FTR-ALL

(दीनानाथ घारपुरे)

एमपीसी न्यूज- अद्भुतरम्य, रहस्यमय, कथा आपणाला ऐकायला, वाचायला आणि पहायला आवडतात, त्यामध्ये भयानकतेची साथ रंजकपणे मांडली असेल तर प्रेक्षक तिथे ओढला जातो. अश्याच कल्पनेवर आधारित एक वेगळा असा “ तुंबाड “ चित्रपट सादर केला आहे. कलर यलो प्रोडक्शन, सोहम शहा फिल्म्स, न्यूटोन, इरोस इंटरनेशनल आणि आनंद एल राय यांनी हा सिनेमा प्रस्तुत केला असून निर्मिती सोहम शहा, आनंद एल राय, मुकेश शहा, अमिता शहा हे निर्माते आहेत. कथा दिग्दर्शन राही अनिल बर्वे, आनंद गांधी, आदेश प्रसाद यांचे असून, पटकथा राही अनिल बर्वे, मितेश शहा, आदेश प्रसाद, आनंद गांधी यांनी तयार केली आहे. छायाचित्रण पंकज कपूर यांचे असून या मध्ये सोहम शहा, अनिता दाते, हरीश खन्ना, दीपक दामले, रंजीनी चक्रवर्ती, महमद समद, ज्योती मालशे, धुंडिराज प्रभाकर जोगळेकर असे कलाकार आहेत, प्रत्येकांनी आपापल्या भूमिकेला योग्य तो न्याय दिलेला आहे.

माणसाच्या मनांत प्रेम, राग ह्या प्रमाणे लोभाची भावना दडलेली असते, त्याच भावनेवर हि कथा १९ व्या शतकात तुंबाड ह्या गावात घडते, त्या गावात एका ठिकाणी खूप मोठा सोने-नाणी असलेला खजिना दडलेला आहे अशी वदंता असते. विनायक त्याची आई आणि भाऊ हे त्या गावात रहात असतात, त्या खजिन्या विषयी जाणून घेण्याचा प्रयत्न करीत असतात, पण काही कारणाने त्यांना ते गाव सोडून पुणे येथे जावे लागते, पण विनायक च्या मनातून खजिना काही जात नाही, आणि पुढे काय होते ते मी काही सांगणार नाही, त्यामधील गूढता, रहस्यमयता काय आहे ती तुम्हीच अनुभवा.

या मध्ये सोहम शहा यांनी विनायकची भूमिका विलक्षण ताकदीने सादर केली आहे, भूमिकेची बोली आणि देहबोली त्यांनी सुरेख व्यक्त केली आहे. अनिता दाते, हरीश खन्ना, दीपक दामले, रंजीनी चक्रवर्ती, ज्योती मालशे, असे सारेच कलाकार लक्षांत राहतात. तुंबाड चे दिग्दर्शन राही अनिल बर्वे यांनी अप्रतिमपणे केले आहे. प्रत्येक फ्रेम चा विचार त्यांनी केलेला आहे. छायाचित्रण पंकज कुमार, आणि अजय अतुल यांचे संगीत हि एक जमेची बाजू आहे. वातावरण निर्मिती मध्ये गूढता, भयानकता सारे काही अप्रतिम आहे.

एक वेगळ्या वाटेवरून जाणारा उत्तम सिनेमा पाहिल्याचे समाधान नक्कीच मिळेल.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1
.