‘तुंबाड’ चित्रपट आता मराठीत

(दीनानाथ घारपुरे )

एमपीसी न्यूज- अभिनेता सोहम शाहचा एक अनोखा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘तुंबाड’ असं या चित्रपटाचं नाव असून त्याचा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. आनंद एल राय निर्मित या चित्रपटाचा टीझर अंगावर रोमांच उभा करणार आहे.

या चित्रपटाचे बहुतांश शूटिंग महाराष्ट्रातच झाली आहे. महाराष्ट्राशी चित्रपटाच्या कथेचा संबंध असल्याने 12 ऑक्टोबर रोजी हा चित्रपट हिंदी आणि मराठीत प्रदर्शित होणार आहे.

अनेक युगांपासून तो पृथ्वी देवीच्या कुशीत झोपून राहिला. पण एकेदिवशी त्याला आपल्या पूर्वजांनी चिरनिद्रेतून जागं केलं. कारण त्याचा शाप आपल्यासाठी वरदान होता, अशी कथा या टीझरमधून सांगण्यात येत आहे. ‘तुंबाड’ची कथा ही 1920 च्या काळातली आहे. पुण्यातील एका प्रतिष्ठित बाह्मण कुटुंबाच्या तीन पिढ्यांच्या अवती- भवती फिरणारी ही कथा आहे. त्यामुळे एकंदरीत या थरारपटाच्या टीझरने प्रेक्षकांची उत्सुकता नक्कीच वाढवली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.