Pune:पुन्हा-26/11मराठी चित्रपटाचे ट्रेलर आणि म्यूजिक लाँच

एमपीसी न्यूज  : मुंबईतील 26/11 च्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर आधारित ईकेसी मोशन पिक्चर्स प्रस्तृत पुन्हा-26/11’ हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. सुमीत पोफळे लिखित आणि दिग्दर्शित ह्या सिनेमाचा  ट्रेलर आणि म्यूजिक  लाँचिंग सोहळा पुण्यात झाला. 
ह्या कार्यक्रमाला प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर, मित्ताली पोकळे, गंगाराम कडूकर, पुलिस निरिक्षक मिलिंद गायकवाड़, अतुल साथपळे, आशिष सिंग, रोहिदास कोकरे, जयेश कोकरे, चैताली रोडे, ब्रह्मानंद क्लोपासक आदि प्रमुख पाहुणे उपस्थित होते. ह्या चित्रपटाच्या माध्यमातून येणा-या 3 महिन्यात 5 लाख पोलिस मित्र बनवणे हा मुख्य उद्देशआहे. आजवर सिनेमांमध्ये एकतर पोलिस भ्रष्ट असतात असेच दाखवले जाते किंवा अशा प्रकारच्या सिनेमात दहशतवाद्यांनी कशा प्रकारे हल्ला केला हेच दाखवले जाते, परंतु सुमीत पोफळे यांनी सिनेमातून पोलिसांची खरी कामगिरी दर्शवण्याचा प्रयत्न केला आहे.
ह्या सिनेमात मिताली पोफळे ही एटीएस अधिका-याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर नितीन कर्जतकर, सुनील गोडबोले,राजेंद्र कांबळे, गोपाळ गायकवाड, सरोज राव,संगीता एस. यांच्या देखील प्रमुख भूमिका आहेत. तसेच प्रशांत तपस्वी आणि कै. सागर बेंद्रे यांनी ह्या चित्रपटात पाहुणे कलाकार म्हणून काम केलं आहे.छायांकन अनक भागवत यांचे आहे. सुमीत पोफळे आणि मेल्विन मेंडस हे या गाण्याचे संगीतकार असून डॉ. कपिल जोशी हे ह्या गाण्याचे गीतकार आहेत. तसेच समीर भेदी आणि रोहिदास कोकारे हे ह्या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.