Pune News : विविध उपक्रमांनी ‘सूर्यदत्त’मध्ये मराठी राजभाषा दिन साजरा

एमपीसी न्यूज : मराठी कथा, कादंबऱ्या व काव्यसंग्रहाचे पुस्तक प्रदर्शन, कुसुमाग्रजांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धा, मराठी स्वाक्षरी करण्याची स्पर्धा अशा विविध उपक्रमांतून सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये मराठी राजभाषा दिन उत्साहात साजरा करण्यात आला. (Pune News) प्रसिद्ध मराठी कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीदिनी मराठी राजभाषा दिन साजरा करण्यात येतो. विद्यार्थी व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून या प्रदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

‘सूर्यदत्त’च्या ग्रंथालयाच्या वतीने सर्व पुस्तकप्रेमी वाचकांसाठी मराठी पुस्तकांचे प्रदर्शन लावण्यात आले. यामध्ये मराठी साहित्य, कथा, कादंबरी, काव्यसंग्रह आणि इतर विविध प्रकारची पुस्तके समाविष्ट होती. विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पुस्तकांचे वाचन केले. विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची गोडी निर्माण होण्याच्या उद्देशाने हे प्रदर्शन महत्वपूर्ण ठरले.

पुस्तक वाचनानंतर कुसुमाग्रजांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धा, मराठीतून स्वाक्षरी करण्याची स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये अनेकांनी कलात्मक सादरीकरण करत सहभाग घेतला. (Pune News) मराठी भाषेत वैशिष्ट्यपूर्ण स्वाक्षरी करण्याची संधी स्पर्धकांना यामुळे मिळाली. भाषा आणि संस्कृतीची ओळख करून देण्याचा प्रयत्न यामधून झाला. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली.

Pune News : आमदार चषक स्पर्धेसाठी 16 संघ मैदानात

‘सूर्यदत्त’चे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया, उपाध्यक्षा व सचिव सुषमा चोरडिया यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रंथपाल तृप्ती लासरेकर, प्रणिता गांधी, पूजा भुजबळ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनात परिश्रम घेतले. यावेळी अधिष्ठाता प्रा. डॉ. प्रतीक्षा वाबळे, प्रा. केतकी बापट, प्रा. दीपक सिंग, प्रा. मनीषा कुंभार, प्रा. शिल्पा संत, प्रा. अमोल गुप्ते यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मराठी स्वाक्षरी स्पर्धेत सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी ऋतुजा राठोडने प्रथम, शिक्षक संदीप ढोरे यांनी द्वितीय व सूर्यदत्त इन्स्टिट्यूट (Pune News) ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीचे शिक्षक डॉ. आनंद गायकवाड यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.

कुसुमाग्रजांवरील प्रश्नमंजुषा स्पर्धेत सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी अनिशा बारीकने प्रथम, सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट अँड टेक्नॉलॉजीची विद्यार्थिनी स्वप्नाली पवारने द्वितीय आणि सूर्यदत्त कॉलेज ऑफ मॅनेजमेंट, इन्फर्मेशन रिसर्च अँड टेक्नॉलॉजीच्या शिक्षिका ज्योती गायकवाड यांनी तृतीय पारितोषिक मिळवले.

मराठी भाषेचा अभिमान, आदर प्रत्येकाने करायला हवा. सर्वार्थाने समृद्ध अशा मराठीच्या संवर्धनासाठी आपण मराठी बोलले पाहिजे, वागले पाहिजे आणि त्यासाठी योगदान दिले पाहिजे.(Pune News) मुलांना लहानपणापासून मराठी भाषा अवगत करण्यासाठी पालकांनी पुढाकार घ्यावा.” असं मत सूर्यदत्त ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांनी व्यक्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.