Marathi pilot dies in plane crash: कोझिकोड विमान अपघातात मराठी वैमानिकाचा मृत्यू

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – केरळमध्ये कोझिकोड विमान दुर्घटनेत कॅप्टन दीपक वसंत साठे या मराठी वैमानिकाचा मृत्यू झाला आहे. कॅप्टन साठे भारतीय वायुसेनेतून निवृत्त झालेले फायटर पायलट होते.

ही विमान दुर्घटना घडली तेव्हाच वैमानिकाचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली. कॅप्टन दीपक वसंत साठे असं अपघातात ठार झालेल्या मराठी वैमानिकाचे नाव असल्याचे स्पष्ट झाले आहे.

कोझिकोड विमानतळावर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाला भीषण अपघात झाला. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाला. त्यात कॅप्टन दीपक साठे यांचाही समावेश आहे.

कॅप्टन दीपक साठे हे भारतीय वायुसेनेचे निवृत्त फायटर पायलट होते. एक चांगले कुशल फायटर पायलट म्हणून त्यांना अनेक महत्त्वाच्या पुरस्कारांनीही गौरवण्यात आले होते.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.