गंभीर विषयाचा विनोदी रंग : ‘तेरा दिवस प्रेमाचे’

(दीनानाथ घारपुरे )

एमपीसी न्यूज- नाटककार आनंद म्हसवेकर हे गेली अनेक वर्षे एकांकिका, हौशी व व्यावसायिक रंगभूमीवर लेखक, दिग्दर्शक व निर्माता म्हणून कार्यरत आहेत. आता त्यांचे 22 वे नवेकोरे व्यावसायिक नाटक रंगभूमीवर येत आहे. ‘तेरा दिवस प्रेमाचे’ असे या नाटकाचे शीर्षक आहे. आनंद म्हसवेकर यांनी आतापर्यंत गंभीर; तसेच विनोदी बाजाची विविध नाटके लिहिली आहेत. मात्र ‘तेरा दिवस प्रेमाचे’ या नाटकाचे वैशिष्ट्य म्हणजे, एक गंभीर विषय त्यांनी विनोदी पद्धतीने या नाटकात मांडला असून मनोरंजन आणि गंभीर प्रवृत्ती याची अनोखी सांगड त्यांनी या नाटकात घातली आहे.

‘प्रयोग फॅक्टरी’ निर्मित व ‘जिव्हाळा’ प्रकाशित या नाटकाचे लेखन आनंद म्हसवेकर यांनी केले असून, शिरीष राणे हे या नाटकाचे दिग्दर्शक आहेत. अनुराधा सामंत या नाटकाच्या निर्मात्या आहेत. संदेश बेंद्रे यांनी या नाटकाच्या नेपथ्याची जबाबदारी सांभाळली आहे. मयुरेश माडगांवकर यांचे पार्श्वसंगीत; तर विनय आनंद यांची प्रकाशयोजना आहे. कार्यकारी निर्माता म्हणून विनय म्हसवेकर हे काम पाहात आहेत. अरुण नलावडे यांच्यासह माधवी दाभोळकर, संजय क्षेमकल्याणी, शर्वरी गायकवाड, मेघना साने, देवेश काळे व संजय देशपांडे हे कलाकार या नाटकात भूमिका साकारत आहेत.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.