Marathi Rap Song : ‘इज्जतीत घरी रहा’ रॅप साँग प्रदर्शित

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊननंतर देशात अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. असे असले तरी कोरोना संकट अद्याप गेले नाही. त्यामुळे अनावश्यक बाहेर न फिरता घरातच रहा, असा सल्ला दिला जातो. तरीदेखील अनेक तरुण आज बाहेर फिरताना दिसतात. त्यामुळे युवकांमध्ये प्रचलित झालेले शब्द वापरून तयार केलेले ‘इज्जतीत घरी रहा’ हे गाणे नुकतेच झी म्युझिकवर प्रदर्शित करण्यात आले असून त्याला युवकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे.

‘इज्जतीत घरी रहा’ हे बोल असलेल्या या गाण्याचे दिग्दर्शन व संकलन अनिल शिंदे यांनी केले असून विकी मगर यांनी हे गीत गायले आहे. संगीत चिराग आसोपा यांचे आहे. तर प्रोडक्शनची जबाबदारी अजय शिंदे यांनी सांभाळली आहे.

याबाबत बोलताना दिग्दर्शक अनिल शिंदे म्हणाले की, पश्चिमात्य संगीताचा प्रकार असलेला रॅपसॉंग हा प्रकार तरुणाईला भुरळ घालताना दिसतो. त्यामुळे अनेक उत्तम गाणी आजवर रसिकांसमोर आली. पण रॅपसॉंग हा प्रकार हाताळला गेला नसल्याने हे गाणे तयार केले. या गाण्याला रसिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.