MSRTC Marathi Song : ‘एसटी’च्या गाडीने जाऊ…’ परिवहन महामंडळाचे नवे गीत 

एमपीसी न्यूज : ‘प्रवासी हिताय, प्रवासी सुखाय’ हे ब्रीदवाक्य घेऊन राज्यभरात धावणाऱ्या लालपरीची जाहिरात करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार वायरल होत आहे.

‘एसटीच्या गाडीने जाऊ….सौंदर्य देशाचे पाहू’ या ओळीने सुरुवात होणारी जाहिरात सोशल मीडियावर हिट झाली आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या जळगाव विभागातील कर्मचाऱ्यांनी ही जाहिरात तयार केली आहे. या जाहिरातीच्या निमित्ताने मात्र कोरोनाच्या या संकटातून बाहेर पडून पुन्हा एकदा नव्या उमेदीने धावणाऱ्या लालपरीची सर्वत्र चर्चा होत आहे.

कोरोनामुळे सध्या सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. कोरोनामुळे बंद पडलेली एस.टी. महामंडळाची सेवा अनेक महिन्यानंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पण अजूनही प्रवाशांची संख्या कमीच आहे.

_MPC_DIR_MPU_II

त्यामुळे प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी एस.टी.ने ही जाहिरात केली आहे. या गाण्यात सहा महिला एस.टी.च्या विविध गुणांची माहिती करून देताना दिसत आहेत. एस.टी.नेच प्रवास करण्याचं आवाहन करत आहेत.

चार मिनिटांचे हे गाणं सोशल मीडियावर चांगलंच व्हायरल झालं असून प्रत्येक जण शेअर करतानाही दिसून येत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.