Pune Crime News : गांजाची तस्करी करणारा सराईत गजाआड

एमपीसी न्यूज – दिड वर्षांपासून फरार असलेला व गांजाची तस्करी करणाऱ्या सराईताला पोलिसांनी गजाआड केले आहे. ही कारवाई पुणे आयुक्तालयाच्या अंमली पदार्थ विरोधी पथक एक यांनी केली आहे.
सागर मोहन जाधव (वय.26 रा.वाघोली) असे अटक आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,जाधव याला पोलीस मागील दिड वर्षांपासून शोधत होते. कारण जाधव हा पुणे येथे होणाऱ्या गांजाच्या तस्करीचा मुख्य सुत्रधार होता. त्याला यापूर्वीही 2021 साली अटक करण्यात आली होती. मात्र त्यानंतर तो फरार झाला, तेव्हापासून तो पोलिसांच्या हातावर तुरी देत होता.अंमली पदार्थ विरोधी पथकाला बातमीदारामार्फत जाधव हा त्याच्या राहत्या घरी येणार असल्याची खबर मिळाली.
त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला अटक केली. त्याच्याकडे अधिक तपास केला असता हडपसर पोलीस ठाण्यात त्याच्यावर एन.डी.पी.एस. अक्टनुसार गुन्हा दाखल असल्याचे समोर आले. याचा पुढील तपास अंमली पदार्थ विरोधी पथकातील सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे करत आहेत.