Rafale Air Crafts : बहुचर्चित ‘राफेल’ विमानांच्या ताफ्याने भारतात येण्यासाठी घेतली भरारी

The much talked about 'Rafale' air crafts are flying to India फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन घेतले उड्डाण 

एमपीसी न्यूज – बहुचर्चित ‘राफेल’ विमानांचा भारतात येण्यासाठी प्रवास सुरू झाला आहे. राफेल विमानांच्या पहिल्या तुकडीने फ्रान्स मेरिनॅक एअर फोर्सच्या तळावरुन भारतात येण्यासाठी उड्डाण केले आहे. फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी याबाबत व्हिडिओ प्रसारित करत ही माहिती दिली आहे. 
या विमानांनी फ्रान्समधून उड्डाण करण्यापूर्वी फ्रान्समधील भारतीय राजदूतांनी तिथे जाऊन भारतीय वैमानिकांची भेट घेतली. डासू कंपनीने वेळेवर या विमानांची डिलिव्हरी केल्याबद्दल तसेच फ्रेंच एअरफोर्स आणि तिथल्या सरकारचे आभार मानले. ही विमाने भारतात घेऊन येणे, ही भारतीय वैमानिकांसाठी अभिमानाची बाब असून ते उड्डाणासाठी प्रचंड उत्सुक्त आहेत. राफेलमुळे भारताची हवाई शक्ती कैकपटीने वाढणार आहे.  असे भारतीय राजदूतांनी आपल्या संदेशात म्हटले आहे.

जगातले सर्वोत्तम वैमानिक राफेलला घेऊन आकाशात झेपावले आहेत. भारत-फ्रान्स संरक्षण सहकार्य नव्या उंचीवर पोहोचण्याचे हे संकेत आहेत असे टि्वटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, ही विमाने फ्रान्स ते भारत या सात हजार किलोमीटरच्या प्रवासात फक्त यूएई मधील फ्रेंच एअर बेसवर एकदा लँडिंग करतील. फ्रान्समध्ये प्रशिक्षित करण्यात आलेले भारतीय वैमानिक ही विमाने घेऊन भारतात येत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.