Sangvi News : कौटुंबिक कारणांवरून विवाहितेचा छळ; चौघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – कौटुंबिक कारणावरून विवाहितेला मारहाण करून तिचा छळ केला. याप्रकरणी चार जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना पिंपळे सौदागर येथे घडली.

पती प्रसाद सुधाकर कुंजीर, सासरे सुधाकर प्रभूजी कुंजीर, सासू आणि नणंद (सर्व रा. पिंपळे सौदागर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. याबाबत 28 वर्षीय विवाहितेने मंगळवारी (दि. 1) सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 12 मार्च 2020 ते 1 डिसेंबर 2020 या कालावधीत घडली. फिर्यादी विवाहिता या पती, सासू, सासरे आणि नणंद यांच्यासोबत सासरी नांदत असताना आरोपींनी आपसांत संगनमत करून फिर्यादी यांना घरगुती कारणावरून शिवीगाळ करीत मारहाण केली. ‘तू उंडगी आहेस, तू तुझ्या आईच्या घरी जा’, असे म्हणून तिला माहेरी सोडले व पुन्हा नांदविण्यास नकार देत तिचा शाररिक व मानसिक छळ केला. सांगवी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.