Chakan News : पुत्रप्राप्तीसाठी विवाहितेचा छळ ; सासुसह भोंदुबाबाला अटक

खालुंब्रेतील अघोरी कृत्य

एमपीसी न्यूज : दोन्ही मुली झाल्यानंतर वंशाला दिवा हवा म्हणून विवाहितेला छळणा-या सासूसह अंगारा देणारा भोंदूबाबा यांना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेनंतर पती मात्र फरारी आहे. पती, सासू व भोंदूबाबाने सबंधित विवाहितेला अंगारा आणि हळदी कुंकू फासल्याचा प्रकार उघडकीस आल्याने तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. खेड तालुक्यातील खालुंब्रे येथे सदरचा अघोरी प्रकार घडला होता.

उच्चशिक्षित एकतीस वर्षीय पिडीत विवाहितेने याप्रकरणी महाळुंगे इंगळे पोलीस चौकीत तक्रार दिली होती. पिडीतेच्या फिर्यादीवरून तिचा पती ऋषिकेश सुदाम बोत्रे ( वय – 38), सासू प्रमिला सुदाम बोत्रे ( वय – 52, दोघेही रा. खालुंब्रे, ता. खेड ) व भोंदूबाबा बबन दगडू पवार ( वय – 55, रा. कामशेत, ता. मावळ ) यांच्या विरोधात जादूटोना प्रतिबंधक कायदा व विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

गुन्हा दाखल होताच लेबर व्यावसायिक ऋषिकेश बोत्रे हा फरार झाल्याचे पोलिसांनी सांगितले.  महाळुंगे पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.