BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : विवाहितेचा छळ, सासरच्या सहा जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – माहेराहून 5 लाख रूपये घेऊन येण्यासाठी विवाहितेला शिवीगाळ करत उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार थेरगाव येथे नुकताच उघडकीस आला. 

सचिन किसनराव कणसे, विद्या किसनराव कणसे, सुप्रिया स्वप्निल मोरे, स्वप्निल सुभाष मोरे, रविंद्र नारायण कणसे, राजेंद्र नारायण कणसे (सर्व रा. 713 वर्धमान व्दारीका क्रांतीनगर, थेरगाव) यांच्या विरोधात वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 25 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहितेला माहेराहून 5 लाख रूपये घेऊन येण्यासाठी आरोपींनी तगादा लावला होता. विवाहितेने पैसे आणण्यास नकार दिल्याने आरोपींनी शिवीगाळ करत तिला उपाशी पोटी ठेवून शारीरिक व मानसिक छळ केला. पोलीस उपनिरीक्षक मोहन जाधव अधिक तपास करत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.