Marriage App Crime : शादी डॉट कॉमवर ओळख, लग्नाच्या आमिषाने बलात्कार अन् आर्थिक फसवणूक

एमपीसी न्यूज : शादी डॉट कॉम या (Marriage App Crime) वेबसाईटवर ओळख झाल्यानंतर लग्न करण्याच्या बहाण्याने तरुणीवर बलात्कार करून तिची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. येरवडा पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 29 वर्षीय तरुणीने या प्रकरणी तक्रार दिली आहे. शांतनु गंगाधर महाजन (वय 28, रिव्हरडेल सोसायटी, खराडी) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि फिर्यादी यांची ओळख शादी डॉट कॉम या वेबसाईटवर झाली होती. त्यानंतर आरोपीने लग्न करण्याचा भाना करून फिर्यादी सोबत ओळख वाढवली. त्यानंतर वेळोवेळी तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल. पीडित तरुणीची इच्छा नसतानाही आरोपीने तिला हॉटेलवर घेऊन जात तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवले.

Pune Crime : दारू पिण्याच्या वादातून मित्राचा खून, पुण्यातील घटनेने खळबळ

शारीरिक संबंध ठेवत असताना आरोपीने फिर्यादीची नजर चुकवून तिचा मोबाईल घेतला आणि पीडितेचा मेल आयडी त्याच्या मोबाईलमध्ये ऍड केला. त्यानंतर आरोपीने (Marriage App Crime) फिर्यादीच्या नावावर 14 लाख रुपये घेतले. आणि फिर्यादीची फसवणूक केली. येरवडा पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.