Wakad : घरात एसी बसविण्यासाठी माहेरहून पैसे न आणल्याने विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – घरात एसी बसविण्यासाठी तसेच फ्रिज घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणले नाहीत. तसेच मुलगी झाली म्हणून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. ही घटना 6 जून 2015 ते 19 जानेवारी 2019 या कालावधीमध्ये रहाटणी येथे घडली.

याप्रकरणी विवाहितेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अविनाश जोतीराम खामकर, सासरे जोतीराम मोतीराम खामकर, सासू पुष्पा खामकर, दीर पंकज खामकर, जाऊ तेजस्विनी खामकर, दीर मकरंद खामकर जाऊ पूजा खामकर (सर्व रा. आशीर्वाद कॉलनी, जय मल्हार गिरणीजवळ, रहाटणी) यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात एसी बसविण्यासाठी आणि फ्रिज घेण्यासाठी माहेरहून पाच लाख रुपये आणण्याची मागणी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे केली. तसेच तिला मुलगी झाली, या कारणावरून आरोपींनी विवाहितेला वारंवार शिवीगाळ आणि मारहाण करत शारीरिक व मानसिक छळ केला. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस उपनिरीक्षक संगीता गोडे तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.