Chakan : विवाहितेचा छळ; पतीसह तिघांवर गुन्हा

कोयाळी येथील प्रकार

एमपीसी न्यूज – वीस वर्षीय विवाहितेला किरकोळ कारणावरून शिवीगाळ, दमदाटी करून व उपाशीपोटी ठेवून तिचा मानसिक, शारीरिक छळ व जाचहाट केल्या प्रकरणी पतीसह सासू व सासरा अशा एकाच कुटुंबातील तिघांवर शनिवारी ( दि. २२ सप्टेंबर ) रात्री उशिरा जाचहाट प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पती अनिल शंकर भाडळे, सासू उज्ज्वला शंकर भाडळे व सासरा शंकर भगवंत भाडळे (सर्व रा. कोयाळी, ता. खेड ) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांची नावे आहेत. कीर्ती अनिल भाडळे ( वय – २० वर्षे, मूळ रा. कोयाळी, सध्या – रा. कडाचीवाडी, ता. खेड,) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, कीर्ती ही कोयाळी येथे तीच्या सासरी नांदत असताना दि. १५ मे, २०१७ ते आजपर्यंत वरील तिघेजण तिला संगनमताने किरकोळ कारणावरून गेल्या दीड वर्षापासून छळत होते. तुला स्वयंपाक नीट येत नाही, असे म्हणून तिला शिवीगाळ, दमदाटी, करून तिला जगणे असय्य केले. रोजच्या होत असलेल्या या जाचहाट व छळाला कंटाळून कीर्ती यांनी चाकण पोलीस ठाण्यात शनिवारी ( दि. २२ सप्टेंबर ) दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलिसांनी तिचा पती अनिल, सासू उज्वला व सासरा शंकर भाडळे या तिघांवर गु.र.नं. ८४८/२०१८ नुसार, भा.द.वि.कलम ४९८ ( अ ), ३२३, ५०४ व ५०६ अन्वये जाचहाट केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.