Nigdi : जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आणण्याची मागणी करत विवाहितेचा छळ

244

एमपीसी न्यूज – जागा घेण्यासाठी आई-वडिलांकडून पैसे घेऊन येण्याची मागणी करत सासरच्या मंडळींनी विवाहितेचा छळ केला. तसेच पतीने माहेरच्या लोकांना शिवीगाळ केली. हा प्रकार जानेवारी 2015 ते बुधवार (दि. 12) दरम्यान निगडी येथे घडला.

याप्रकरणी 22 वर्षीय महिलेने निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती सचिन भाऊसाहेब घोडके, सासरे भाऊसाहेब बाबुराव घोडके, सासू लक्ष्मी भाऊसाहेब घोडके, दीर राजू भाऊसाहेब घोडके (सर्व रा. गुरुदत्त हाऊसिंग ओटास्किम, निगडी) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेवर तिचा पती सचिन याने जागा घेण्यासाठी माहेरहून पैसे आण, अशी वारंवार मागणी केली. त्यासाठी विवाहितेने नकार दिला. म्हणून सासरच्या मंडळींनी तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक व शारीरिक छळ केला. विवाहितेच्या भाऊ, आई, वडील यांना फोन करून सचिन याने मारण्याची धमकी दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निगडी पोलीस तपास करीत आहेत.

HB_POST_24_Oct
HB_POST_END_FTR-A2
%d bloggers like this: