Chinchwad : चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज – चारित्र्यावर संशय घेत विवाहितेचा छळ केल्यावरून पतीसह ससारच्या मंडळींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार बिजलीनगर, चिंचवड येथे घडला.

याप्रकरणी पती विशाल उर्फ विठ्ठल सुर्यभान घावटे (वय35, रा.बिजलीनगर, चिंचवड. मूळ रा. पांढरी, पांगरी, ता. बार्शी, जि. सोलापूर), सासू, सासरे, नणंद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल याचा पीडित महिलेसोबत 10 डिसेंबर 2010 रोजी विवाह झाला. त्यानंतर पत्नीच्या चारित्र्याच्या संशय घेऊन त्याने व त्याच्या घरच्यांनी पत्नीला त्रास दिला. सासरच्या सर्व मंडळींनी विवाहित महिलेचा किरकोळ कारणावरून छळ केला. यावरून पीडित महिलेने कंटाळून सोमवारी (दि. 29) पोलिसात तक्रार दिली. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही. चिंचवड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक प्रशांत महाले तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.