Nigdi : चारित्र्यावर संशय घेऊन विवाहितेचा छळ; माहेरहून कार आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला. तसेच तसेच तिच्याकडे माहेरहून चारचाकी कार आणि दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. हा प्रकार एप्रिल 2016 ते फेब्रुवारी 2017 दरम्यान कोंढवा खुर्द येथे घडला.

फहमिदा माज शेख (वय 26, रा. चिंचवड) यांनी याप्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पती माज फय्याज शेख, सासू रफत फय्याज शेख, सासरा फैय्याज बशरत शेख, चुलत सासरा फैसल बशरत शेख (सर्व रा. अशोका म्यूज, कोंढवा खुर्द, पुणे) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फहमिदा आणि माज हे दोघे पती-पत्नी आहेत. फहमिदा यांच्या वडिलांनी त्यांच्या लग्नावेळी त्यांना सहा तोळे सोन्याचे दागिने दिले होते. लग्नानंतर काही महिन्यांनी सासरचे मंडळी फहमिदा यांच्या चारित्र्यावर संशय घेऊन त्याचा छळ करू लागले. त्यांना वारंवार मारहाण तसेच टोचून बोलू लागले. काही दिवसांनी सासरच्या मंडळींनी फहमिदा यांना माहेरहून एक चारचाकी कार आणि दोन लाख रुपये आणण्यास सांगितले. सासरच्या लोकांच्या मागणीला फहमिदा यांनी विरोध केला. दरम्यान फहमिदा यांना मुलगी झाली. त्यामुळे फहमिदा यांच्यावर त्यांचा पतीसह सर्व सासरचे लोक नाराज झाले. या कारणावरून देखील मारहाण करू लागले. फहमिदा यांच्या वडिलांनी दिलेले सहा तोळे सोन्याचे दागिने फहमिदा यांना देण्यात आले नाहीत. यावरून फहमिदा यांनी त्यांचा पती, सासू, सासरा आणि चुलत सासरा यांच्या विरोधात गुन्हा नोंदवला. निगडी पोलीस तपास करीत आहेत.न

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.