Chinchwad News : पतीच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, पतीला अटक 

एमपीसी न्यूज – पतीसोबत सततचे भांडण आणि त्यामुळे होणा-या त्रासाला कंटाळून 20 वर्षीय विवाहित महिलेनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. चिंचवड पोलिसांनी महिलेच्या पतीने अटक केली आहे. सायली कॉम्प्लेक्स, वाल्हेकर वाडी, चिंचवड येथे शनिवारी (दि.26) सायंकाळी चार वाजता ही घटना घडली. 

प्रतिभा आकाश चौरे (वय 20) असे आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचं नाव आहे. मुलीच्या आईने रविवारी दिलेल्या फिर्यादीवरून, आत्महत्या केलेल्या विवाहित महिलेचा पती आकाश सुधाकर चौरे (रा. वाल्हेकर वाडी, चिंचवड) याला अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी आकाश विवाहित महिलेला सतत टोमणे मारायचा. मला तुमच्या घरच्यांनी स्विकारले नाही, मानपान केला नाही, असे म्हणून फिर्यादी महिलेला मारहाण करायचा. तसेच, प्रतिभा चौरे यांच्यासोबत सतत भांडण करुन त्यांना त्रास द्यायचा. या त्रासाला कंटाळून प्रतिभा यांनी राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली आहे. आरोपीला अटक केली असून, चिंचवड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.