Chikhali: लग्न मनासारखे न केल्याने छळ; सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

Married woman committed suicide due to harassment of Father in law family विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी आरोपी मंजुनाथ हिने फाडून टाकून दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

एमपीसी न्यूज – विवाहितेच्या माहेरच्या लोकांनी तिचा विवाह सासरच्या लोकांच्या म्हणण्याप्रमाणे लावून न दिल्याच्या कारणावरून, तसेच लग्नामध्ये मानपान केला नाही, या कारणावरून विवाहितेचा छळ केला. सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेने अखेर गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत सासरच्या तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

राजू शिवलिंगअप्पा वीरशेट्टी, सुधा राजू वीरशेट्टी, मंजुनाथ गंगणहळ्ळी अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी विवाहितेचा भाऊ प्रसाद रेवणसिद्ध कलशेट्टी (वय 25, रा. कलबुर्गी, कर्नाटक) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी राजू यांच्या मुलासोबत फिर्यादी प्रसाद यांच्या बहिणीचा विवाह झाला होता. फिर्यादी यांची बहीण सासरी नांदत असताना आरोपींनी आपसात संगनमत करून आमच्या मनासारखे लग्न केले नाही व लग्नामध्ये मानपान केला नाही, असे म्हणत विवाहितेला वारंवार वेगवेगळ्या कारणावरून टोचून बोलत.

तसेच विवाहितेची नोकरी करण्याची इच्छा नसताना देखील तिला नोकरी करून पैसे आणून दे, अशी जबरदस्ती आरोपींनी केली. आरोपींकडून होत असलेल्या शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली.

दरम्यान, विवाहितेने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. ती चिठ्ठी आरोपी मंजुनाथ हिने फाडून टाकून दिली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. चिखली पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.