Bhosari : विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

एमपीसी न्यूज – राहत्या घरात गळफास घेऊन विवाहितेने आत्महत्या केली. ही घटना भोसरी येथे मंगळवारी (दि. 24) दुपारी घडली.

_MPC_DIR_MPU_II

भाग्यश्री रवींद्र लंघे (वय 25, रा. खंडेवस्ती, भोसरी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी भाग्यश्री यांनी राहत्या घरात छताच्या लोखंडी अँगलला कपड्याच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब घरच्यांच्या लक्षात येताच त्यांनी भाग्यश्री यांना त्वरीत रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्‍टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.