Chakan News : जातीवाचक बोलून विवाहित महिलेला घराबाहेर काढले, पती सासू विरोधात गुन्हा

एमपीसी न्यूज – जातीवाचक बोलून शारिरीक व मानसिक त्रास देऊन विवाहित महिलेला घराबाहेर काढले. याप्रकरणी पती आणि सासुविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला आहे. आर.पी.एस टाऊनशीप, चाकण, खेड येथे 7 डिसेंबर 2020 ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत ही घटना घडली.

पिडीत विवाहित महिलेने याबाबत चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून पती सुमित शितल पाटील (वय 31) आणि सासु यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी वारंवार फिर्यादी यांना जातीवाचक बोलून शारिरीक व मानसिक त्रास दिला. तसेच, महिलेला घरातून हाकलून दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे. चाकण पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.