Hinjwadi : विवाहितेचा छळ, सासरच्या सात जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहितेला मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी सासरच्या सात जणांवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 42 वर्षीय विवाहितेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अनिल काशीराम भोसले (रा. बावधन, पुणे), ननंद सरिता चंद्रकांत साळवी, तिचे पती चंद्रकांत सिताराम साळवी, दुसरी ननंद निकीता नंदकिशोर सकपाळ, तिचे पती नंदकिशोर राजाराम सकपाळ, सासू आशा काशीराम भोसले, भाची गायत्री गणेश जाधव यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी भाची गायत्री जाधवकडे ठेवण्यासाठी दिलेले 40 तोळे सोने मागितल्या कारणावरून आरोपींनी फिर्यादी यांना वेळोवेळी शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. त्यांचा शारिरीक व मानसिक छळ केला.  हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.