Hinjwadi : पैशांसाठी विवाहितेचा छळ    

एमपीसी न्यूज – दुचाकी आणि पोल्ट्रीफार्मसाठी जागा खरेदी करण्याकरिता माहेराहून पैसे आणावेत, या मागणीसाठी विवाहितेचा छळ करणा-या पतीवर हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत 27 वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे.

सुमित सुरिंदर कौल (वय 28, रा. रिव्हर व्ह्यु सोसायटी, बालेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी सुमितचे मार्च 2018 मध्ये लग्न झाले. लग्न झाल्यापासून सुमितने पत्नीला दुचाकी व पोल्ट्री फार्मकरिता जागा खरेदी करण्यासाठी माहेराहून पैसे आणण्याची मागणी करत शारीरिक व मानसिक छळ सुरू केला. पत्नीच्या नावावरील हुंडाई आयटेन ही मोटार स्वतःच्या नावावर करून घेतली. हिंजवडी पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.