Pune : पतीच्या त्रासाला कंटाळून अकराव्या मजल्यावरून उडी मारून पत्नीची आत्महत्या

एमपीसी न्यूज – संशयी पतीच्या छळाला कंटाळून पत्नीने अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. ही घटना हडपसर परिसरात शनिवारी (7 जुलै) घडली.

मीनाक्षी गिरीश पांडे (वय-46, कॉसमॉस अपार्टमेंट, मगरपट्टा सिटी हडपसर) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी गिरीश सुरजप्रसाद पांडे (वय-47) याच्यावर हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृत महिलेचा भाऊ मृत्युंजय पाठक (वय-56,मध्यप्रदेश) यांनी तक्रार दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गिरीश पांडे आणि मीनाक्षी पांडे यांना एक मुलगा आहे. मागील काही वर्षापासून गिरीश पांडे पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिचा मानसिक छळ करीत असे. या सततच्या छळाला कंटाळून मीनाक्षी पांडे यांनी 7 जुलै रोजी राहत असलेल्या इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक यु.व्ही पुणे हे करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.