Pune Crime : लग्न करुन बदला घ्यायचा होता म्हणत विवाहितेचा छळ

एमपीसी न्यूज –  लग्न करुन तुझ्याकडून बदला घ्यायचा होता (Pune Crime )म्हणत पती व सासरच्या मंडळींनी  विवाहितेचा छळ केला आहे. हा प्रकार 29 एप्रिल 2012 पासून एप्रिल 2022 या कालावधीत मुळशी व चैन्नई येथे घडला आहे.

याप्रकरणी पीडितेने हिंजवडी पोलीस ठाण्यात मंगळवारी (दि.14) तक्रार दिला असून पती थंगराजा, महिला आरोपी, सासरे रामाकृष्णा,दिर रविंद्रन व राजा रामकृष्णा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Bhosari Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लौंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा पती थंगराजा याने पीडितेला शिवीगाळ करत, हाताने मारहाण केली. तसेच तुझ्याशी लग्न तुझा छळ करण्यासाठी केला आहे.(Pune Crime) तुझ्या कडून बदला घ्यायचा आहे, असे म्हणत धमकावले. तसेच रिती,भाषा येत नाही म्हणत सतत टोमणे देणे, अपमानीत करणे, घरातून बाहेर काढत फिर्यादीचा छळ केला. यावरून हिंजवडी पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.